पंढरपुरात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन - Maharashtra now 24

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 16, 2026

पंढरपुरात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पंढरपुरात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पंढरपूर:

शिवभक्त प्रतिष्ठान, पंढरपूर यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 'रक्तदान हेच जीवनदान' हा संदेश देत अनमोल मानवी जीवन वाचवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

हे रक्तदान शिबीर बुधवार, दिनांक १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार पडणार आहे. पंढरपूर येथील स्टेशन रोडवरील हॉटेल श्रीराम समोर असलेल्या 'जाधवजी जेठाबाई धर्मशाळा' येथे हे शिबीर संपन्न होईल.

या सामाजिक उपक्रमासाठी सौ. सरजुबाई बजाज रक्तपेढी, पंढरपूर यांचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे. शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याही वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून मोठ्या संख्येने रक्तसंकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी श्री. श्रीराम गणपुले (८८०६७९०३६५) आणि श्री. वैजनाथ जाधव (९३०७०९४५०७) यांच्याशी संपर्क साधता येईल.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages