मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांना दिवाळी किटचे वाटप
पंढरपूर प्रतिनिधी : दिवाळी सणाच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील सर्व नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या दिवाळी किटमध्ये साखर, रवा, मैदा, गोडेतेल, डालडा, चकली पीठ, मोती साबण, उटणे, सुगंधी तेल, मीठ, खोबरे, डाळे, चुरमुरे, पोहे, शेंगदाणे तसेच फटाक्यांसह दिवाळीसाठी आवश्यक साहित्याचा समावेश करण्यात आला होता.
या साहित्याचे वाटप तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ दादा भालके, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष अभिराज उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेविका माधुरी धोत्रे, नगरसेवक लोकेश यादव, मनसेचे शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, पिंटू गायकवाड, दादा घोडके, दिनेश पांढरे, दादा क्षीरसागर, जगदीश लकेरी, बापू खिलारे, संतोष सर्वगोड, नाथा यादव, प्रसाद यादव, लाला पेंटर, शफी मुलाणी, जमीर सय्यद, विवेक शिंदे, बाळू देवमारे, भोला साठे, राजू वाघमारे, नागेश इंगोले, भावड्या माने, धनाजी सुरवशे, दत्ता कटके, सोमा काटे, पप्पू बदपट्टे यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळीच्या सणात सर्वसामान्य नागरिकांच्याही घरात आनंदाचा प्रकाश पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे प्रभागातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.


