प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांसाठी दिलीप बापू धोत्रे यांच्याकडून मोफत दिवाळी किट वाटप

Maharastra now 24
0

 प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांसाठी दिलीप बापू धोत्रे यांच्याकडून मोफत दिवाळी किट वाटप

दिवाळीचा आनंद सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम

पंढरपूर प्रतिनिधी :

प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांना दिवाळी सणानिमित्त मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या तर्फे मोफत दिवाळी किटचे वाटप करण्यात येणार आहे.

या दिवाळी किटमध्ये नागरिकांना साखर, रवा, मैदा, तेल, शेंगदाणे, चुरमुरे, डाळ, डाळडा, मोती साबण, बजाज तेल, चकली पीठ, खोबरे, बेसन, पोहे, उटणे, मीठ तसेच फटाकड्यांचा समावेश असणार आहे.

सणासुदीच्या काळात सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक हातभार लागावा आणि प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा आनंद साजरा करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

नगरसेविका सौ. माधुरीताई दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीचा आनंद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.

Tags

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)