पंढरीत भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसाठी बहुजन मेळावा उत्साहात संपन्न
पंढरपूर : राज्यातील भटक्या विमुक्त जमातींची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्यांना राजकीय व सामाजिक स्तरावर एकत्र आणण्याची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे दि. 29 मार्च रोजी बहुजन परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.
रेल्वे स्थानकाजवळील बिर्ला हाऊस येथे रविवारी सकाळी ११ वाजता हा मेळावा उत्साहात पार पडला. भटक्या विमुक्त समाजातील रामोशी, होलार, बेरड, नंदीवाले, वैदू, वडार, कोल्हाटी, गारुडी आदी तब्बल ४२ जातींचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे अनेक प्रतिनिधी आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्याने मेळाव्याला वेगळे आकर्षण प्राप्त झाले.
राज्यात भटक्या विमुक्त जमातींची लोकसंख्या अंदाजे अडीच ते तीन कोटी असून, समाज एकसंघ नसल्यामुळे विविध राजकीय व सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर समाजाच्या मागण्या प्रभावीपणे मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. शिक्षणाचा अभाव आणि संघटितपणाचा अभाव यामुळे समाजावर अन्याय होत असून, त्याला वाचा फोडण्याचे कार्य जय मल्हार क्रांती संघटनेने सातत्याने केले आहे.
यापुढे समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे यांना विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती अंकुश जाधव यांनी दिली.
ह्या वेळी अंकुश जाधव सर प्रदेशाध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना सुधीर नाईक युवक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना मोहन घाडगे बाबुराव जमादार दीपक चव्हाण विष्णू आप्पा चव्हाण नामदेव माळी गणेश माळी वामन यांना संतोष करचे सागर गोडसे दादासाहेब पवार इंद्रभान ओव्हाळ सचिन निकम गोविंद मंडले सुनील काका जाधव अग्नीनाथ बापू चव्हाण महेश मदने गंगाराम जाधव रोहिदास मदने गंगुताई नाईक यांची प्रमुख उपस्थिती

