प्रा. शिवाजी बागल यांच्या संशोधनास भारत सरकारच्या पेटंट विभागाची मान्यता
पंढरपूर – ‘जिरेनियम वनस्पतीपासून ऑईल तयार करत असताना त्यातून हायड्रोसोल नावाचा एक दुय्यम पदार्थ तयार होतो. हा पदार्थ यापूर्वी वापरात आणला जात नव्हता. तर तो टाकाऊ म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असे. हायड्रोसोल द्रावणावर प्रक्रिया करून त्यापासून रूम फ्रेशनर, एअर फ्रेशनर
आणि मोस्कीटोरिपेलांट हे तयार केले आहे.’ असे संशोधन प्रा. शिवाजी बागल यांनी केले असून या संशोधनास भारत सरकारच्यापेटंट विभागाकडून मान्यता मिळाली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त
महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक शिवाजी बागल यांनी हे संशोधन केले आहे. जिरेनियम च्या शेतात शेतकरी विष्णू देठे यांच्याशी संवाद साधत असताना झालेल्या मौलिक चर्चेतून या संशोधनाचा शोध लागला.
या संशोधनासाठी प्रा. बागल यांना सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथील वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधक मार्गदर्शक डॉ.मानसी पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. चंद्रकांत खिलारे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नवनाथ पिसे यांनी एकत्रित संशोधन केले आहे.
प्रा. शिवाजी बागल यांच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच त्यांच्या या उत्पादनामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, त्याशिवाय याचे मानवी शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. अशा
सर्वोपयोगी संशोधनामुळे प्रा. बागल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.