माढा तालुक्यातील वडोली गावामध्ये अभिजीत पाटलांची घोड्यावरून मिरवणूक
प्रतिनिधी पंढरपूर/-
माढा तालुक्यातील वडोली या गावांमध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे गाव भेटीसाठी गेले असता चक्क ग्रामस्थांनी अभिजीत पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्वागत केले.
घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर अभिजीत पाटील यांनी लोकांचं प्रेम काय असतं याचा प्रत्यय मी माढा मतदारसंघातील जनतेकडून घेतो आहे. व्यक्तीगत माणसांच्या आयुष्यात घोड्यावर बसण्याचा क्षण हा एकदाच असतो परंतू घोड्यावर बसून हालगीच्या तालात आमदार होण्यापूर्वीच 'आमदार' म्हणून अविस्मरणीय मिरवणूक वडोली येथील ग्रामस्थांनी अविस्मरणीय मिरवणूक काढली असे उद्गार भारावून गेलेल्या अभिजीत पाटील यांनी काढले.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की;माढा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यावर एकच तोडगा म्हणजे बदल करणं! आणि त्याच बदलांवर आपल्याला काम करण्याची प्रचंड मोठी संधी आहे. शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून अविरत काम करण्याची भुमिका जनमानसात मिसळंल की आपोआप जोड लागते.
यावेळी वडोलीचे सरपंच मा.सतीश काळे, डीव्हीपी बँकेचे नूतन चेअरमन औदुंबर महाडिक, उपसरपंच साधून पडळकर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शंकर सुरवसे, धनाजी काळे, प्रगतीशील बागायतदार भगवान बंडगर, गोरख पडळकर यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते..