उमेद जिंकणार तरुणांची मने
पंढरपूर:-अमोल कुलकर्णी
ब्राह्मण महासंघ पंढरपूर शाखेच्या वतीने पंढरपूर, सांगोला,माळशिरस,मंगळवेढा या चार तालुक्यातील समाज सेवक व्यक्तींची विचार-विनिमय बैठक जिल्हा संघटक अमृता बडवे यांच्या निवासस्थानी पार पडली यावेळी अनेक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ब्राह्मण समाजाचे तरुण तरुणी उपस्थित होते.महाविद्यालयीन तरुणांचे संघटन,व्यवसाय,उद्योग पर्यटन, अर्थकारण यावर चर्चा करण्यात आली त्यादृष्टीने जिल्ह्यातील तरुणांचे प्राथमिक एक दिवसीय कार्यशाळा उमेद घेण्याचे ठरले.यावेळी तालुका अध्यक्ष चैतन्य केसकर,उपाध्यक्ष पिंटू कुलकर्णी चळे,
शहराध्यक्ष भक्ती उत्पात शहर उपाध्यक्ष देवकी बडवे,व्याख्याते तुकाराम चिंचणीकर,वकील संदीप कागदे,पत्रकार कल्याण कुलकर्णी,सुप्रिया मुदगल अकलूज,अमृता कुलकर्णी बीटरगावकर,श्रद्धा देशपांडे सांगोला,अनिता बेले सांगोला, भोसेकर कुलकर्णी,संजय दिवेकर,वैभव बडवे,महेश कोर्टीकर,सौ.वांगीकरसह 25 जण उपस्थित होते.याबाबत प्रास्ताविक भक्ती उत्पात यांनी केले.जिल्हा संघटक अमोल कुलकर्णी यांनी तब्बल दोन तास युवक संघटन व सर्व कार्यपध्दती सांगून मार्गदर्शन केले.यावेळी अनेक प्रश्न शंका समाधान वेळी जिल्हा भर नियोजन करण्याचे ठरले.