उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू

0

उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू 

माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केली परिसराची पाहणी

(करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांचीही होती उपस्थिती)

उजनी धरणाचे अधिकाऱ्यांसोबत पार पडली महत्त्वपूर्ण बैठक



प्रतिनिधी/- 


माढा - पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे धडाडीचे आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या मतदार संघाचे व्हिजन समोर ठेवत विकास झपाट्याने व्हावा. यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासून प्रयत्न चालविले आहेत. त्यातीलच एक महत्वाच्या म्हणजेच उजनी धरणाच्या पर्यटन स्थळ विकासासाठी हिवाळी अधिवेशनवेळी प्रश्न मांडला होता. त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यावेळी उजनी धरणावरील पाणी सोडण्याचे नियोजन जाणून घेत धरणाची पाहणी केली.


सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावे. त्यामुळे मोठे अर्थकारण या भागासाठी उपल्ब्ध होईल. यासाठी माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांनी नागपूर अधिवेशनामध्ये उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावे. म्हणूनच आवाज उठवला असता, त्यावर तातडीने उजनी धरण भिमानगर येथे उजनी धरणाचे अधिकारी व आ. अभिजीत पाटील व आ. नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. त्यावेळी आमदार अभिजीत पाटील यांनी उजनी धरणाचीही आवर्जून पाहणी केली आहे.


यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संजय  कोकाटे, भारत पाटील, नितीन  कापसे, सरपंच प्रमोद कुटे, डीव्हीपी बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक, नाना महाडिक, सौदागर जाधव, यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !