विटे येथे हाटभट्टी दारू अड्ड्यावर तालुका पोलिसांचा छापा. पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई

 विटे येथे हाटभट्टी दारू अड्ड्यावर तालुका पोलिसांचा छापा.

पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई



पंढरपूर तालुक्यातील  विटे गावच्या एका शेतात मोकळ्या जागेत झाडीमध्ये   अवैध   हातभट्टी अड्ड्यांवर  कारवाई करण्यात आली . त्यामध्ये एकूण  ४०० लिटर हातभट्टी दारू, किंमत ४०हजार ,रुपये किंमत व १८०० लिटर गुळमिश्रित रसायन   ६३हजार- असे एकूण एक लाख तीन हजार रु किमतीचा मुद्देमाल व  हातभट्टी दारू तयार करण्याचे  साहित्य पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केले  आहे.

 सदर जागेच्या शेतमालकाविरुद्ध व दारू विकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

 सदरची कारवाई  श्री अतुल कुलकर्णी सो पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण   अप्पर पोलीस अधीक्षक  प्रीतम यावलकर  ,  उप विभागीय अधिकारी डॉ अर्जुन भोसले   यांचे मार्गदर्शनाखाली  पोलिस निरिक्षक टी वाय मुजावर    , तालुका पोलीस स्टेशन  भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी पोलीस हेडकॉन्स्टेबल , विनायक क्षीरसागर  पोलीस हेडकॉन्स्टेबल  अमोल गावडे पोलीस कॉन्स्टेबल , हूसेन नदाफ पोलीस कॉन्स्टेबल या पथकांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post