पंढरपूर शहरातील अवजड वाहतूक बाहेरून करत सिग्नल व्यवस्था सुरू करा

0

 पंढरपूर शहरातील अवजड वाहतूक बाहेरून करत सिग्नल व्यवस्था सुरू करा

पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे पोलीस निरीक्षक घोडके यांना निवेदन



पंढरपूर- पंढरपूर शहरामध्ये बायपास रोड असताना ही अवजड वाहतूक शहरातून होत आहे. त्याकडे डोळे झाक होताना दिसत आहे. तरी बायपास रोडला दिशादर्शक फलक बसवून ती वाहतूक शहरामध्ये न येता बाहेरच्या बाहेर वळविण्यात यावी. सकाळी व दुपारच्या वेळेत शहरात येणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्यात यावी तसेच शहरातील गाड्यांची संख्या लक्षात घेता प्रत्येक रोडला ट्रॅपिक जाम  होत आहे. तरी महत्वाच्या गर्दीच्या चौकात सिग्नल बसवून ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत तातडीने सिग्नल व्यवस्था चालू न झाल्यास व शहरातून होणारी जड वाहतूक  सकाळी व दुपारीच्या वेळेस बंद न केल्यास या विरोधात आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनाची प्रत सोलापूर लोकसभेच्या कॉंग्रेसच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांना पाठविण्यात आली असून यावेळी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष संदिप शिंदे, सेवा दल शहराध्यक्ष गणेश माने,  सोलापूर जिल्हा सरचिटणीस पांडुरंग डांगे, सोशल मिडीया शहराध्यक्ष महेश अधटराव, शहर उपाध्यक्ष नागनाथ अधटराव, मिलिंद अढवळकर,  भिमाशंकर इंगोले, संग्राम मुळे, चिटणीस सुहास गायकवाड, एकनाथ माने, सुदिप पवार आदि कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !