डॉ आनंद गायकवाड यांचा अटकपूर्व जमीनअर्ज नामंजूर
पंढरपूर ( प्रतिनिधी)
पंढरपूरतील संतपेठ येथे राहणारे फळ विक्रते यल्लपा पांडुरंग घुले यांनी दि २४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती यल्लपा घुले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्टी लिहलेली होती त्यामध्ये डॉ आनंद गायकवाड, विजय शहाणे,सतीश रोकडे या सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे असे नमुद केलेले होते त्या त्यांनंतर घुले यांच्या कुटुंबीयांनी पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खाजगी सावकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दाखल केली होती न्यायालयाने सदर सावकार यांच्या न्यायालयाने भा. द.वि कलम 306 प्रमाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते
गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ गायकवाड यांनी पंढरपूर न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज दाखल केला होता सदर अर्जाची सुनावणी झाली यात मे न्यायालयाने डॉ गायकवाड यांच्या अटकपूर्वजमीनअर्ज नामंजूर केला
सदर केस कामी सरकार पक्षातर्फे सारंग वांगीकर मूळ फिर्यादी तर्फे अँड अमोल देसाई,अँड संतोष भोसले,अँड विशाल वाघेला,अँड सत्यम धुमाळ यांनी काम पाहिले. पंढरपूर शहरात सध्या अवैध सावकारीचे
प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. घुले प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट असून या आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाही. यावरून अवैध सावकारी करणाऱ्या सावकारांना पोलिसांचे अभय आहे की काय ? असा सवाल जनतेतून केला जात आहे. कोरोना काळात अर्थचक्र ठप्प झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.