समाजसेवक संजय बाबा ननवरे यांना ७ वा राज्यस्तरीय पुरस्कार.
पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर येथील समाजसेवक श्री संजय बाबा ननवरे यांना त्यांच्या विशेष समाजकार्यातील योगदानासाठी राज्यातील मानाचा ७ वा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.समाजातील विविध रांजल्या गांजल्या लोकांच्या मदतीला धावून त्यांना आर्थिक, तसेच इतर स्वरूपात मदत करण्याची त्यांची विशेष खासियत पंढरपूरकराना परिचित आहे.
याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड आदिवासी कोळी महासंघ यांच्या वतीने हा विशेष पुरस्कार रविवार दि१जानेवारी रोजी पिंपरी येथील संत तुकाराम नगर मधील आचार्य अत्रे नाट्यगृहात प्रदान करण्यात आला. भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, आमदार रमेश पाटील, मा. महापौर योगेश बहेल, नामदेव ढाके, डॉ हेमंत सोनवणे, संजय कोरबु,पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संजय बाबा ननवरे यांना पुरस्कार बहाल करण्यात आला.पंढरपूर येथील शेकडो गरजू लोकांना, अपघातात मरण पावलेल्या कुटुंबीयांना,विधवा महिला, शिक्षण घेणाऱ्या परंतु आर्थिक बाजू कमकुवत असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्यांनी मदतीचा हात देऊन सर्व समस्या दूर केल्या. त्यांची ही दानशूर वृत्ती, दयाळू स्वभावाची दखल घेऊन पिंपरी चिंचवड आदिवासी कोळी महासंघ यांच्या वतीने या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.