महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करत पदाधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन

Maharastra now 24
0

 महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करत पदाधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन

‘रुक्मिणी दिवाळी महोत्सवा’चे थाटात उद्घाटन

*पंढरपूर (दि. ४)* – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पंढरपूर अंतर्गत आज पंढरपूर पंचायत समितीच्या परिसरामध्ये रुक्मिणी दिवाळी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.



या महोत्सवाचे उद्घाटन पंढरपूर पंचायत समितीचे विद्यमान सभापती *श्री शुभम आगवणे साहेब* यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपसभापती *मा. श्री प्रमोद देशमुख साहेब*, पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी *श्री अमोल जाधव साहेब* तालुका अभियान व्यवस्थापक श्री. कृणाल पाटील, सन्माननीय पंचायत समिती सदस्य *श्री शहाजी मुळे, श्रीमती सावली गायकवाड, श्रीमती प्रमिला झांबरे, श्री विजय शिंदे, श्रीमती वंदना फाटे* उपस्थित होते.


यावेळी ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या मातीचे दिवे, पणत्या, आकाश कंदील, फराळ, घरगुती उत्पादने व हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची पाहणी केली व खरेदी करून महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले.


*महोत्सवाला भेट देऊन स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे :*


नागरिकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट देऊन ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे, असे आवाहन सभापती श्री शुभम आगवणे यांनी केले.


 पंढरपूर येथे सुरु राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

उद्घाटन प्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, सर्व प्रभाग समन्वयक,कृषी व्यवस्थापक ,व उमेद अभियानातील महिला बचत गटांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags
  • Newer

    महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करत पदाधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)