नुकसानग्रस्त पिकांची प्रांताधिकारी इथापे यांनी केली पाहणी
पंढरपूर, दि. 28 :- पंढरपूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपुर्वी झालेल्या मान्सुनपुर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी तालुक्यातील अनवली,सिध्देवाडी, एकलासपूर येथील नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष बांधावर पोहोचून पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पंचनामे गतीने व अचूकपणे पुर्ण करावेत. पंचनामे करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार यांची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी इथापे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी इथापे यांनी मौजे एकलासपूर येथील तानाजी गायकवाड व सुरेखा कोल्हे यांच्या नुकसानग्रस्त केळी पिकांची पाहणी केली. तसेच सिध्देवाडी येथील दत्तात्रय कवडे यांच्या नुकसान झालेल्या केळी व आंबा या फळबागांची त्याचबरोवर अनवली येथील वादळी वाऱ्याने कोसळलेल्या वीजेच्या टॉवरची पाहणी केली.
याप्रसंगी मंडल अधिकारी बाळासाहेब मोरे, तलाठी अश्विनी शेंडे, कृषी सहाय्यक कैलास भोसले, ग्रामसेविका रत्नमाला बनसोडे उपस्थित होते