स्वेरीमध्ये ‘डिझाईन थिंकिंग, क्रीटीकल थिंकिंग अँड इनोव्हेशन डिझाइन’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

0
स्वेरीमध्ये ‘डिझाईन थिंकिंग, क्रीटीकल थिंकिंग अँड इनोव्हेशन डिझाइन’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

पंढरपूर- स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागांतर्गत असलेल्या 'इसा' अर्थात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंटस् असोशिएशन आणि इन्स्टिटयूशन्स  इनोव्हेशन कौन्सिल यांच्या तर्फे ‘डिझाईन थिंकिंग, क्रीटीकल थिंकिंग अँड इनोव्हेशन डिझाइन’ या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. 
     दीप प्रज्वलनानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.डी.ए.तंबोळी यांनी प्रास्तविकात ही कार्यशाळा आयोजित  करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. या कार्यशाळेच्या  पहिल्या सत्रात इंटर्नल क्वालिटी अशुरन्स सेलचे समन्वयक डॉ. एस. एस. वांगीकर यांनी ‘सस्टेनेबल इनोव्हेशन’ याबद्धल माहिती दिली. दुसऱ्या सत्रात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.डी.ए.तंबोळी यांनी ‘टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन इन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट’ याबद्दल मार्गदर्शन केले तर तिसऱ्या सत्रात प्रा.एस.व्ही.मोहोळकर यांनी ‘आयडिया जनरेशन अँड स्क्रीनिंग’ या विषयावर माहिती सांगितली. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. एम.एम. पवार यांनी ‘इंट्रोडक्शन टू डिझाईन थिंकिंग अँड क्रिटिकल थिंकिंग’ या संकल्पना स्पष्ट केल्या तर दुसऱ्या सत्रात  एमबीएचे विभागप्रमुख प्रा.के. बी. पाटील यांनी ‘ब्लूमिंग इन स्टार्टअप इको सिस्टम’ याबाबत मार्गदर्शन  करत भविष्यात स्टार्टअप करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या हे स्पष्ट केले. तिसऱ्या सत्रात प्रा.व्ही.ए.सावंत यांनी ‘एम्पथी मॅपिंग’ यावर विचार व्यक्त केले. तिसऱ्या दिवशीच्या पहिला सत्रात संशोधन अधिष्ठाता डॉ. ए.पी.केने यांनी इव्होल्युशन, डिझाईन थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग अँड इनोव्हेशन थ्रू रिसर्च वर्क’ या विषयावर मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रात प्रा.पी.बी. रोंगे यांनी ‘इंटरप्रेनरशीप डेव्हलपमेंट’ याबाबत सविस्तर माहिती दिली तर त्यांनीच तिसऱ्या सत्रात ‘केस स्टडीज अँड प्रॉब्लेम सॉलव्हींग बेस्ड ऑन इंटरप्रेनरशीप’ या विषयी विचार व्यक्त केले. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात डॉ.डी. ए. तंबोळी यांनी ‘अनलॉकिंग बिझनेस सक्सेस’ यावर  मार्गदर्शन करत विविध संकल्पना स्पष्ट केल्या. दुसऱ्या सत्रात डॉ.एस. एस. गिल्डा यांनी ‘लिगल लेअर: अंडरस्टँडिंग ट्रेडमार्क्स पेटंट अँड कॉर्पोरेट’ यावर सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले. तिसऱ्या सत्रात डॉ. डी.ए.तंबोळी यांनी ‘फिटिंग आयडिया इन टू लिन कॅनव्हास मॉडेल’ यावर मार्गदर्शन केले. पाचव्या दिवशी डॉ.एम.पी.ठाकरे यांनी सलग तीन सत्रात दिलेल्या मार्गदर्शनात ‘मॅपिंग इनोव्हेशन थ्रू टीआरएल, एमआरएल, आयआरएल’, ‘युक्ती' च्या माध्यमातून आयडिया तयार कशा कराव्यात? तसेच ‘शोकेसिंग आयडिया थ्रू इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन’ यावर विचार व्यक्त केले. अशा रीतीने ही पाच दिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. यामध्ये इलेकट्रीकल इंजिनिअरिंग विभागातील १३ प्राध्यापक व ६९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा.व्ही.ए.सावंत यांनी काम पहिले तर कार्यशाळेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना  डॉ.डी.ए.तंबोळी, डॉ.एम.पी.ठाकरे आणि प्रा. डी.डी.डफळे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !