अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे करून मदत मिळावी कल्याण राव काळे यांचे उपुख्यमंत्री यांना निवेदन
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यात फळ बागांचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे त्वरित पंचनामे होऊन शेतकर्यांना भरीव मदत मिळावी. तसेच विमा कंपन्यांची पिक विम्याची मुदत 31 मार्च ला संपते त्या मध्ये बदल करुन 31 मे पर्यंत विमा कंपन्यांची मुदत वाढवून देण्यात यावी. कारण मागील पाच वर्षांपासून एप्रिल आणि मे या दोन महिन्यात अवकाळी पाऊस व वादळी वार्याचे प्रमाण वाढले आहे. आणि या ही वर्षी याच एप्रिल आणि मे या दोन महिन्यात अवकाळी पाऊस व वादळी वारे झालेने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.*(केळी,द्राक्षे,दाळिंब व ईतर पिके)* त्यामुळे ही मुदत वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळेल या साठी मा.कल्याणराव काळे साहेब यांनी निवेदन दिले. या वेळी उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार यांनी निवेदनाची दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.