'स्वेरी' कडून नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी जनजागृती अभियान

0
'स्वेरी' कडून नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी जनजागृती अभियान                                                                     

स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले ‘मतदार जनजागृती’चे पथनाट्य

पंढरपूर- आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाकडून पंढरपूर शहर, श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, गोपाळपूर आदी ठिकाणी नवीन मतदारांच्या नोंदणीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘मतदार जनजागृती’ बाबतचे सुंदर असे प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले. सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुका प्रशासन यांच्याकडून सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद, पंढरपूरचे प्रांताधिकारी श्री. सचिन इथापे व पंढरपूरचे तहसीलदार श्री. सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार प्रबोधनाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पंढरपूर तालुका प्रशासनाचे  नायब तहसीलदार (महसूल)  श्री. पी.के.कोळी, नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी अँड.सुनिल वाळूजकर यांनी मतदान जनजागृती बाबत अत्यंत महत्वाची माहिती दिली. 
         यावेळी पंढरपूर तालुका प्रशासनाचे  नायब तहसीलदार  श्री. पी.के.कोळी यांनी 'मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून, वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवयुवकांनी या लोकशाहीच्या उत्सवात भाग घेण्यासाठी मतदार नोंदणी अवश्य करावी. आपल्या सोबत मतदानासाठी नोंदणीसाठी पात्र असे मित्र, नातेवाईक यांना सुद्धा मतदार नोंदणी करण्यास सांगावे' असे आवाहन केले. पुढे मार्गदर्शन करताना पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी अँड.सुनिल वाळूजकर म्हणाले की, ‘१८ वर्षे वय पूर्ण झालेल्या तरुण तरुणींनी आपला राष्ट्रीय हक्क असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान करणे यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण कराव्यात तसेच  येत्या निवडणुकीत आपण निर्भीडपणे मतदान करावे.’ असे त्यांनी आवाहन केले.  यावेळी स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी मतदान केल्यामुळे आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधींकडून विकास कामे, प्रशासकीय कामे, साक्षरता, महिला जनजागृती व शैक्षणिक क्षेत्राविषयी विकास कामे अधिक गतिमान करता येतील हे सुचविणारे ‘मतदान जनजागृती’चे उत्तम पथनाट्य सादर केले. हे पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरीकांनी गर्दी केली होती. यावेळी  नायब तहसीलदार (निवडणूक) वैभव बुचके, मंडळ अधिकारी तथा नोडल ऑफिसर बाळासाहेब मोरे, तलाठी मुसा काझी गोपाळपूरचे सरपंच विलास मस्के व उपसरपंच उदय पवार, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मंडळी यांच्यासह मंडलाधिकारी, तलाठी व संबधित अधिकारी व कर्मचारी, स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.एस. साठे, डॉ. एम.एम. आवताडे, प्रा. बी.टी. गडदे, प्रा.पी.व्ही. पडवळे, प्रा.एम.ए.सोनटक्के इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्ष्कीतर कर्मचारी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वेरीचे  सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर पथनाट्य सादर करून या जनजागृती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
स्वेरीने मतदार जागृती संदर्भातील प्रबोधनात्मक पथनाट्याद्वारे केलेले सादरीकरण पाहण्यासाठी मंदिर परिसरात आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली. पथनाट्य संपल्यानंतर सादरीकरण केलेल्या कलाकारांशी या दर्शकानी संवाद साधला. मतदार नोंदणी का, कशी, कुठे आणि केंव्हा केली पाहिजे याची माहिती त्यानी विद्यार्थ्यांकडून आपुलकीने जाणून घेतली. परराज्यातून आलेले भाविक सुद्धा आपुलकीने हे पथनाट्य व पंढरपूर प्रशासनाने स्वेरीच्या माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !