४ मार्चला डिजिटल मिडियाची बारामतीत राज्यस्तरीय कार्यशाळा
महाराष्ट्रातील दहा महिला पत्रकारांचा महागौरव पुरस्काराने सन्मान होणार
सुनेत्रा पवार यांची पहिलीच प्रकट मुलाखत ख्यातनाम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी घेणार
नमस्कार,
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या सिध्दगिरी कणेरी मठ येथे झालेल्या ठरावानुसार राज्यातील पत्रकारांसाठी आयोजित येणाऱ्या कार्यशाळा मालिकेतील पहिली कार्यशाळा येत्या ४ मार्च रोजी बारामती येथे होत आहे.या कार्यशाळेच्या निमित्ताने होत असलेली सौ.सुनिता अजित पवार यांची प्रकट मुलाखत विशेष औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.सौ.सनेत्रा पवार यांची प्रथमच होत असलेली ही प्रकट मुलाखत नटरंग फेम ख्यातनाम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी घेणार आहे.
महिला दिन सप्ताहाच्या निमित्ताने संघटनेच्यावतीने राज्यातील दहा कर्तबगार महिला पत्रकारांचा महागौरव राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करुन सन्मान केला जाणार आहे.११ हजार रुपये व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.कार्यशाळेत पत्रकारांची निवडणूक काळातील आचार संहिता, डिजिटल माध्यमाचे अर्थकारण व नवे प्रवाह, गुन्हेगारीच्या बातम्या आणि कायदा आदी विषयांवर तज्ज्ञ मान्यवर विचार मंथन करणार आहेत.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच संघटनेची राज्य कार्यकारिणी व सदस्य परिश्रम घेत आहेत.
आपला,
राजा माने,
संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.