राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जागर शिव विचारांचा व्याख्यानाला
छत्रपती शिवरायांचे विचार भविष्यासाठी मार्गदर्शक असून वर्तमानात दिशादर्शक आहेत ते आजच्या तरुणांनी आत्मसात करावेत यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व युवक प्रदेश यांच्या वतीने शिव सप्ताह अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये जागर शिवविचारांचा व्याख्यानमालेचे आयोजन 19 फेब्रुवारी पासून करण्यात आले आहे.छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रातून आपण उत्तम व्यवस्थापन योग्य सहकाऱ्यांची निवड दूरदृष्टीने भविष्याचा विचार करून आत्मविश्वासाने कठीण परिस्थितीशी झुंज देत यशाचे शिखर सर करण्यासाठी महाराजांची विचार दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. यासाठीच व्याख्यानमालेचे आयोजन केले आसलेचे समाधान काळे यांनी सांगीतले.
या व्याख्यानमालेत ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक शिवाजीराव बागल ह. भ .प. सूर्याजी महाराज भोसले प्रा . शिवजी कौलगे प्रा . समाधान काळे यांची व्याख्याने पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये 19 फेब्रुवारी पासून होत आहेत . आढीव, उपरी, जैनवाडी, भाळवणी, धोंडेवाडी, नांदोरे या गावात व्याख्याने झाली असून त्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची जयंती विचारांचं देणं विद्यार्थ्यांना देऊन साजरी केली जात आहे.