पटवर्धनकुराली शिवजयंती उत्साहात साजरी....
पटवर्धनकुराली -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती येथे स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
असलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन श्री.संभाजी नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा.ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांची निवड करण्यात आली. प्रमुख पाहुणे श्री शाहजी कोळसे हे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
सहशिक्षक श्री कैलास सोनवणे यांनी शिवाजी महाराजांच्या माहिती त्यांच्या मनोगतातून दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मारुती कोळसे अंगणवाडी सेविका खेडेकर मॅडम, रेडके मॅडम, यास्मिन आतार तसेच इतर मान्यवर व शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री धनाजी बोबडे यांनी केले...