पंढरी सायक्लोथॉनचे रविवारी २५ फेब्रुवारीला आयोजन! जिल्हाधिकार्‍यांसह क्रीडामंत्र्यांची उपस्थिती! आयोजक सागर कदम यांची माहिती

0
पंढरी सायक्लोथॉनचे रविवारी २५ फेब्रुवारीला आयोजन! जिल्हाधिकार्‍यांसह क्रीडामंत्र्यांची उपस्थिती! आयोजक सागर कदम यांची माहिती

पंढरपूर (प्रतिनिधी):-  प्रदूषणमुक्तीसह इंधन बचतीच्या अनुषंगाने व पर्यावरणपूरक अशा सायकल मॅरेथॉनचे आयोजन युवा वर्गाला आवड निर्माण व्हावी म्हणून येत्या रविवारी २५ फेब्रुवारीला केले असल्याचे पंढरी सायक्लोथॉनचे आयोजक सागर कदम यांनी सांगितले.
        याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रदुषण मुक्तीसह पर्यावरणपूरक समाज जागृती करण्याच्या उद्देशाने, इंधन बचतीसाठी, विदेशी चलन बचतीसह लहान मुलांमध्ये तसेच युवा वर्गामध्ये सायकलीची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने पंढरपूर शहरात दरवर्षी सायकल मॅरेथॉनच्या आयोजन केले जाते. पंढरी सायक्लोथॉन -२०२४ ही यावर्षी आयोजित केली असून यामध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन पंढरी सायक्लोथॉनआयोजक व आम्ही पंढरपूरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनी केले आहे.
         सालाबाद प्रमाणे साहित्यिक राधेश बादले_पाटील, पंढरपूरचे मा. नगराध्यक्ष सुभाषराव भोसले, जागतिक सायकलपटू दिगंबर भोसले,  विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत आबा पाटील डॉ.अजितजी जाधव, यांच्यासह आदींच्या योगदानातून, तसेच लोकसहभागातून पंढरी सायक्लोथॉनचे रविवारी दि.२५ फेब्रुवारी -२०२४ रोजी पहाटे ६:३० वाजता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आयोजन केले असुन, या कार्यक्रमाला क्रीडामंत्री संजय बनसोडे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेसह अनेक महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक सागर कदम यांनी दिली आहे.
        तसेच शालेय विद्यार्थ्यांसह युवा वर्गाला व ज्येष्ठांना ऑनलाईन अर्ज करून सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. यात प्रामुख्याने सहभागी होत असलेल्या सायकलस्वारांना टीशर्ट, प्रमाणपत्रासह खाऊचे वाटप केले जाणार असुन, टीशर्ट च्या मोजमापाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था केली गेली आहे. त्यासाठी ऑनलाइन व ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, अर्जासाठी स्कॅनसाठी क्युआर कोड, अर्जाची लिंकही सहभागी सायकलस्वारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचा साकल्याने लाभ घेण्याचे आवाहन आम्ही पंढरपूरकर फाउंडेशनचे विश्वस्त सतीश माने,गणेश थिटे,शेखर भोसले, विठ्ठल भुमकर, निलेश कदम ओंकार चव्हाण आदींनी केले आहे.
            नियोजन व्यवस्थापन स्वेरी इंजिनियरिंग सह अनेक शाळा- महाविद्यालये करत आहेत. तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायकलची आवड निर्माण व्हावी म्हणून व पर्यावरण पूरक इंधन बचतीसाठी आपण विद्यार्थ्यांसह स्वतः हजर राहून सहकार्य करावे असे आवाहन अभिजित (आबा) पाटील, डॉ. शितल शहा, राधेश बादले- पाटील, सागर कदम इंजि.श्रीकांत शिंदे, आदि मान्यवरांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !