भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी मा.आ.प्रशांत परिचारक

0

भारतीय जनता पार्टी पंढरपूर  शहर व तालुक्याच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी मा.आ.प्रशांत परिचारक

 अंत्योदयाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक, महान विचारवंत, संघटक आणि गरिबांच्या उन्नतीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे आमचे प्रेरणास्रोत, पंडित_दीनदयाळ_उपाध्यायजी यांच्या पुण्यतिथी  निमित्त आज आपल्या पंढरपूर येथील संपर्क कार्यालयात मा. श्री. आमदार प्रशांत परिचारक यांनी  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.


भारतीय जनसंघ संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा आज 11 फेब्रुवारीला स्मृतीदिन आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक हिंदुत्ववादी विचारवंत आणि भारतीय राजकारणी होते. त्यांनी हिंदू शब्दाचा अर्थ धर्मानुसार नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या रुपात सांगितला. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. शिवाय भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते. त्यांनी राजकारणाशिवाय भारतीय साहित्यात योगदान दिले. त्यांनी लिहिलेल्या सम्राट चंद्रगुप्त नाटक बहुतेकांना आवडले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भारतीय जनसंघाची स्थापना केली.

या प्रसंगी दि.पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतिशजी मुळे, अनिल अभंगराव, सुरेशजी खिस्ते, प्रणव परिचारक, पंडीत भोसले, राहुल पुरवत, शांताराम कुलकर्णी, विनायक हरीदास, ऋषिकेश उत्पात, गणेश शिंघण, राजु कौलवार, चांगदेव कांबळे, भास्कर कसगावडे, सुभाष मस्के, अक्षय वाडकर, संदिप माने, लाला पानकर, राजु घंटी, नितीन धोत्रे, धीरज म्हमाणे, ओंकार जोशी, राहुल परचंडे, ओंकार वाळूजकर, उमेश सर्वगोड, भाऊ टमटम, लखन माने, आदेश कांबळे, प्रथमेश सासवडे, लक्ष्मण शिंदे, शकुंतला नडगिरे, प्राजक्ता बेणारे, अपर्णा तारके,  सुचिता सगर, तसेच पांडुरंग परिवारातील पदाधिकारी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !