आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते तपकिरी शेटफळ व खर्डी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न

0
आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते तपकिरी शेटफळ व खर्डी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न..

तपकिरी शेटफळ येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी केला  भाजपमध्ये प्रवेश

प्रतिनिधी - पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथे आमदार समाधान आवताडे हे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात  गेले असता सदर प्रसंगी आमदार महोदय यांच्या कामावर खुश होऊन तपकिरी शेटफळ गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ आदी शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या विकास गॅरंटीवर आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे  लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन पंढरपूर तालुक्यातील तपकीरी (शे) येथील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वयंस्फूर्तीने जाहीर प्रवेश केला.

केवळ विकासात्मक दृष्टी ठेवून मतदार संघाच्या प्रगतशील परिवर्तनासाठी अहोरात्र झटणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आवताडे यांचे जनसामान्यांमध्ये विश्वासक प्रतिमा आहे. गावाच्या स्थानिक पातळीवरील धोरणात्मक प्रगतीसाठी सर्व नूतन प्रवेशित पदाधिकाऱ्यांनी आमदार महोदय यांच्याबरोबर नेटाने काम करण्याचे यावेळी जाहीर केले आहे.

सदर प्रवेश सोहळा दरम्यान आमदार आवताडे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे यावेळी भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.
तसेच खर्डी येथील बोहाळी रस्ता ते दत्ता पाटील रस्त्याचे भूमिपूजन तसेच महावितरण MSCB (DP) चे उद्घाटन यावेळी आमदार महोदय व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.

सदर प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह दादा देशमुख,रत्नाकर महाराज मठाचे मठाधिपती दाजी महाराज, शिवाजी महाराज,
 सरपंच महादेव मासाळ उपसरपंच काशिलिंग चौगुले ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर शहाजी साबळे, मोहन चौगुले, बाजीराव बनसोडे, शंकर कांबळे, विठ्ठल बनसोडे,  बाळकृष्ण सुडके, विजय देशमुख माणिक काका गंगथडे, माजी सरपंच अरुण चौगुले, सुधाकर मासाळ, मारुती मासाळ, माजी उपसरपंच भारत मोरे, दत्ता कोळी, माऊली मासाळ, कृष्णदेव मासाळ अंकुश मासाळ, पिंटू बुरांडे, शहाजी रोकडे, विष्णू सुडके, गोरख माने, बापू मोरे,चिंतामणी पळसे, म्हाळाप्पा भीमा मासाळ, कुंडलिक माने, समाधान चौगुले, नारायण माने, मोहन रोकडे, महादेव मासाळ, तानाजी रोकडे तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !