भंडीशेगाव मध्ये भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत विविध कार्यक्रम

0
भंडीशेगाव मध्ये भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत विविध कार्यक्रम

- मा.आ.प्रशांत परिचारक यांनी मुक्काम करून साधला नागरिकांची संवाद


पंढरपूर- भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने सांगोला विधानसभा मतदार संघातील भंडीशेगाव येथे माढा लोकसभा प्रभारी व मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘गाव चलो अभियान’ राबवून येथे मुक्काम करीत नागरिकांशी संवाद साधला.
या अभियानामध्ये मा.आ.प्रशांत परिचारक यांनी गावातील देवस्थांचे दर्शन घेवून एक दिवसीय अभियानाची सुरवात केली आहे. व ‘‘घर घर पहुंचाएंगे मोदी का संदेश, आगे बढेगा गाव, आगे बढेगा देश..’’ अशी घोषणा यानिमित्ताने करण्यात आली आहे. तसेच रात्रीचा मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जगत प्रकाश नड्डा यांच्या निर्देशानुसार “गाव चलो अभियान” देश व राज्यभर सुरू करण्यात आले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राज्यभर राबविले जात आहे.
सदर अभियना अंतर्गत मा.आ.प्रशांत परिचारक यांनी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजनांची व विकास कामांची माहिती गावातील सर्व सामान्य नागरिकांना दिली. व गावातील अडचणी व समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक संस्थांना भेट देवून त्यांच्याशी चर्चा केली.
 व गावातील विविध वाड्या वस्त्यांवर जावून ग्रामस्थांसोबत एकत्रितपणे स्नेहभोजन केले व गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आरोग्य शिबीर व महिला बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मा.आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.
बुथ निहाय रचना, सरकारी योजनेतील लाभार्थी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, बचत गट, धार्मिक स्थळांना भेट, ज्येष्ठ कार्यकर्ते, नवमतदार, बुथ कमिटी, समाज क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तीमत्व अशा सर्वांची भेट घेऊन संवाद साधला. तसेच महिला सबलीकरणासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिलांची भेट घेतली व अडचणी जाणून घेतल्या व योजनांची माहिती त्यांना देण्यात आली. त्यांनतर दिवार लेखन उपक्रमा अंतर्गत पुन्हा एकदा मोदी सरकार असे भिंतीवर लेखन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदीजींची गॅरंटी काय आहे, हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारच्या विविध योजना, कामगिरीची माहिती  गावातील जनतेपर्यंत व तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे १० वर्षांतील प्रभावी कार्य, जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्तता याची माहिती दिली मा.आ.प्रशांत परिचारक  यांनी सांगितले.
यावेळी अभियनाअंतर्गत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, बुथ प्रमुख, प्रवास कार्यकर्ता, सुपर वॉरियर्स, गावातील कार्यकर्त, तरूण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !