दैनिक तुफान क्रांती च्या विभागीय उपसंपादक पदी यशवंत पवार सलग तिसऱ्यांदा नियुक्ती
सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ व ध्यास समजून गेली अनेक वर्षापासून सांगोला जिल्हा सोलापूर येथील दैनिक तुफान क्रांती वृतपत्र सोलापूर जिल्हा सह इतर अनेक जिल्ह्यातील राजकिय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून ताज्या बातम्या आपल्या वाचकापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त वंचित पिढीत लोकांना शासन दरबारात न्याय मिळवून देण्यासाठी आपली लेखणी झिजवत असून कामचुकार व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर आपल्या लेखणी चा आसूड उगारून नेहमीच जागल्याची भूमीका पार पाडली आहे दैनिक तुफान क्रांती ने वृतपत्र चा व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून वृतपत्र चालवले असून जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून अनेक जिल्ह्यात परिचित असून केवळ सेवा म्हणून वृतपत्राने आपली प्रतिकूल परिस्थितीत दमदार वाटचाल सुरु ठेवली आहे
पत्रकारांचे कार्यसम्राट यशवंत पवार यांची सलग तिसऱ्यांदा विभागीय उपसंपादक पदी वर्णी
यशवंत पवार हे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष असून राज्यातील पत्रकारांचे मार्गदर्शक आहेतराज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक व प्रभावीपणे काम करून अनेक पत्रकारांचे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना*
*अधीस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*
*पत्रकारांच्या पाल्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती देणे*
*यादीवर नसलेल्या सर्वच वृत्तपत्रानां पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती देणे*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*पक्की घरी नसलेल्या पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात यावीत*
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी*
पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर वारंवार आंदोलन उपोषण निवेदन तसेच राज्यसरकार कडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करून राज्यातील अनेक पत्रकारांचे प्रश्न सोडवले आहेत
यशवंत पवार हे गेली पंधरा वर्षांपासून विविध दैनिक व साप्ताहिक मधून आपली पत्रकारिता करत असून गेली नऊ वर्षांपासून साप्ताहिक कार्यसम्राट वृतपत्र चालवत आहेत निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन त्यांची खसियत असून आपल्या ओजस्वी व तडाखेबाज लेखणीतून अनेकांना फटकारलं असून लेखणीच्या माध्यमातून अनेकांना उरावर अन शिंगावर घेतलं असून रोकठोक लेखन साठी ते प्रसिद्ध आहेत
दैनिक तुफान क्रांती च्या विभागीय उपसंपादक पदी यशवंत पवार यांची सलग तिसऱ्यांदा नियुक्ती केली असून दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिर्जागालिब मुजावर यांनी यशवंत पवार यांना सांगोला येथील कार्यालयात ओळख पत्र देऊन पदभार दिला आहे यावेळी दैनिक तुफान क्रांती चे सोलापूर शहर प्रतिनिधी संतोष म्हेत्रे उपस्थित होते