पंढरपुरात सो.क्ष.कासार समाजाच्या वतीने श्री.कालीका देवी उत्सव मोठ्या थाटात संपन्न समाजाच्या सांघिक परिश्रमामुळे मिरवणुकीत मोठे यश
पंढरपूर- येथील सो.क्ष. कासार समाजाच्या वतीने श्री.कालीका देवी उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. ‘एक दिवस समाजासाठी’ या आवाहनास प्रचंड प्रतिसाद देऊन पंढरपूर मधील सर्व समाज बांधव, भगिनी व जेष्ठ समाज बांधव उपस्थित राहून श्रींचा उत्सव यशस्वीरित्या साजरा केला.
प्रथम श्री.कालीका मातेची महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री.कालिका ढोल ताशा पथकाने ‘सर्व मंगल मांगल्ये!’ या आईच्या जयघोषांने ढोल ताशांच्या निनादात मिरवणुकीस प्रांरभ केला. श्री.कालिकादेवी चौक पासून मिरवणूक निघाली तेथून पुढे काळा मारुती, चौफाळा, नाथ चौक, घोंगडे गल्ली व कासार गल्ली येथे ढोल-ताशाच्या तडफदार वादनाने झालेल्या मिरवणूकीने पंढरपूरकरांची मने जिकंली. अक्षय वाडेकर, हर्षल तिवाटणे, शुभम वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे व युवकांचे ढोल-पथक आकर्षक होते. मिरवणूकीच्या वेळी ठिकठिकाणी समाजबांधवांच्या वतीने प्रदक्षिणामार्गावर सरबत, रसना, फ्रुटी, कुल्फी व पाणी वाटप करुन आपली सेवा अर्पण केली, ढोल- ताशा पथकातील महिला, मुली, युवकांचा उत्साह मिरवणूकीच्या सुरवातीपासून मिरवणूक संपेपर्यंत कुठेही कमी झाला नाही. यामुळे सामाजिक एकीचे दर्शन घडले. ढोल ताशा पथकामुळे मिरवणूकीची शोभा वाढली. ढोलताशामुळे अवघी पंढरी दुमदुमली. श्री.कालिका मातेची भव्यदिव्य मिरवणूक सुरूवाती पासूनच समाजातील स्त्री पुरूषांची उपस्थिती लक्षणीय होती. महिला हया हिरव्या जरदारी साडीत आणि पुरुष हे पांढरे शुभ्र पेहराव मध्ये भारदस्त वाटत होते. ढोल ताशांचा पेहराव रूबाबदार होता. मिरवणूकी दरम्यान उन्हाची तमा न बाळगता सर्वजण मोठ्या उच्छाहात व आनंदात मिरवणुकीत सहभागी होत होते. मिरवणूक जसजशी पुढे जात होती तशतशी मुले, महिला, जेष्ठ नागरिक, अबाल वृद्ध यांची संख्या वाढत होती. मिरवणूकीत रथ व घंटा यांचा देखील समावेश होता. महिलांचे व युवकांचे ढोल-पथक आकर्षक होते. त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष विजय मोहोळकर, चेअरमन अभय भिवरे, उपाध्यक्ष सुधीर सासवडे, सचिव शशिकांत वाडेकर, सहसचिव राजेंद्र झरकर व कार्यकारी मंडळातील सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले त्यानंतर सर्व समाजबांधव भगिनींनी दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच युवक मंडळ, समाज बांधव यांनी भोजनकक्ष येथील जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली.
या उत्सवाचे निमित्ताने सायंकाळी सुप्रसिद्ध कर सल्लागार पवन झंवर यांचे ‘अपने क्रोध से दोस्ती करले’ या विषयावर ‘मोटिव्हेशनल कार्यशाळा’ व इचलकरंजी येथील समाजबांधव अंकुश गरगटे यांचे ‘महाराष्ट्राच्या लोककला पिंगळा’ व ‘फनी गेम्स’चे आयोजन केले होते. यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. अल्पोपहारानंतर श्री च्या उत्सवाची सांगता झाली. यावेळी सर्व समाज बांधव, भगिनी, महिला मंडळ, युवक मंडळ व जेष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी पणे पार पडावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. नवीन कार्यकारी मंडळाचा हा पहिलाच महोत्सव उत्साह वर्धक वातावरणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. श्री.कालिकामातेची गाभाऱ्यातील सफरचंदाची, फुलांची आरास, तोरण, केळींचे खुंटे, नारळाचे बुंधे यामुळे मंदिरातील वातावरण अधिक प्रसन्न जाणवत होते. हा उत्सव यशस्वी होण्यासाठी समाजाचे कार्यकारी मंडळ, युवक मंडळ तसेच महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले.