यशवंत गृहनिर्माण सह.संस्था मर्या. वसंतनगर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी दि.24- पंढरपूर येथील यशवंत गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.वसंतनगर, येथील श्री विठठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्षपुर्ती सोहळा कार्यक्रम निमित्त महापुजा पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांचे शुभहस्ते, संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे उपस्थित संपन्न झाला.,
यशवंत गृह निर्माण सोसायटी मधील विविध समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असून जास्ती जास्त निधीची तरतुद करुन नागरीकांना चांगले रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा देण्यावर कायम भर राहिल असे प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांनी केले. पंढरपूर येथील यशवंत गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.वसंतनगर येथे सोसायटी मध्ये श्री मारुती सभा मंडप या ठिकाणी श्री विठठल रुक्मिणी गतवर्षी प्राणप्रतिष्ठा केली होती त्यास वर्षपुर्ती निमित्त भजन किर्तन, श्री महापुजा तसेच महाप्रसादाचे आयोजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
संस्थेचे चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले की, सोसायटी मधील अंतर्गत रस्ते खराब झालेले आहेत. सभामंडप परिसरातील पेव्हिंग ब्लॉक बसविल्यास मंदिरास शोभा येईल तसेच खुल्या जागेत असणारा विद्युत जनित्र डि.पी. हा धोकादायक असून सदरचा डि.पी. इतरत्र जागेत स्थलांतरीत करावा अशी मागणी आमदार समाधान दादा आवताडे यांचेकडे केली.
यावेळी भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिलदादा सावंत, मनसेचे नेते दिलीपबापु धोत्रे, शशीकांत पाटील, पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक गुरुनाथ अभ्यंकर, रानगट, नारायण शिंगन, सोसायटीचे व्हा.चेअरमन यशवंत पवार, सचिव सुधीर साळूंखे, खटकळेसर, डॉ.विनायक राऊत, सुहासदादा पाटील, रवि सोनार, संजु कांबळे, पांडूरंग साळूंखे, बिरेदार रावसाहेब उपथित होते.