कलापिनी संगीत विद्यालयाची अभुतपूर्व अशी संगीत कार्यशाळा संपन्न
ग्रामीणसह शहरी भागातील विद्यार्थी व पालकांनी घेतला संगीत शिक्षणाचा आनंद
प्रतिनिधी / पंढरपूर
भारतासह जगभरात आपल्या संगीत शिक्षणातून शेकडो विद्यार्थी घडविणारया पंढरपूर मधील कलापिनी संगीत विद्यालय यांची तीन दिवसीय संगीत कार्यशाळा अभूतपूर्व अशा प्रतिसादात संपन्न झाली.
यामध्ये महाराष्ट्रातील विविध ग्रामीणसह शहरी भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तबला,हार्मोनियम व गायन विभागासाठी जवळ जवळ १०० विद्यार्थ्यी व पालकांनीही सहभाग नोंदविला.तबला विषयासाठी जेष्ठ तबला वादक व गुरू दादासाहेब पाटील ,जगभरात आपल्या तबला वादनासाठी प्रसिद्ध असणारे पुणे येथील सुप्रसिद्ध तबला युवा तबला वादक अविनाश पाटील व सोलापूर जिल्ह्यात संगीत कलेचा सर्वाधिक प्रचार व प्रसार करणारे विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले.
तर गायन व हार्मोनियम या विषयांसाठी प्रियंका विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले.कलापिनी संगीत विद्यालयामुळे आज पंढरपूर मध्ये तबला,हार्मोनियम,गायन,गिटार,बासरी व नृत्य आदी कलांच्या उच्चस्तरीय अशी शिक्षण व्यवस्था सहज उपलब्ध होत आहे.