स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी
शिराळे, पांगरी येथील, फटाका कारखान्याचे स्फोटातील मुख्य आरोपी तामिळनाडू येथुन जेरबंद
दिनांक 01/01/2023 रोजी शिराळे पांगरी ता. बार्शी जि. सोलापूर येथील फटाक्याचे कारखान्यातील आगीमुळे झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात एकुण 5 महिला मृत्युमुखी पडल्या असुन, 3 महिला जखमी झालेल्या आहेत. नमुद घटने बाबत पांगरी पोलीस ठाणे गुरंन 01/2023 भादंवि क. 304, 337, 338, 285, 286, 34 सह भारतीय विस्फोटक अधि. क. 5, 9 (ब) प्रमाणे दिनांक 01/01/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री. जालिंदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी उपविभाग हे करीत आहेत. नमुद गुन्हयाच्या तपासात आता पर्यंत तीन आरोपीत यांना अटक करण्यात आली असुन, तीनही आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी नाना शिवाजी पाटेकर रा. गणेश नगर, उस्मानाबाद हा गुन्हा घडल्यानंतर पळुन गेला होता. गुन्हा घडल्यापासुन तो आपले अस्तित्व लपवुन राहत होता. नमुद आरोपी याचा शोध घेवुन त्यास सदर गुन्हयात अटक करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सुहास जगताप यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण येथील धनंजय पोरे, सहा. पोलीस निरीक्षक, यांचे पथकाने आरोपी नाना शिवाजी पाटेकर याचा शोध घेण्यास सुरूवात केली.
सदर पथकाने आरोपी नाना पाटेकर याचा गोपनिय बातमीदार व तांत्रिक पुरावा या मार्फतीने तपास करत असताना असे निदर्शनास आले की, आरोपी हा महाराष्टातुन तामिळनाडु येथे पळुन गेला आहे. नमुद पथकाने तामिळनाडु राज्यात जावुन तामिळनाडु राज्यातील कोईम्बतुर, मदुराई, शिवकाशी या जिल्हयात आरोपी रहात असलेल्या ठिकाणची माहिती मिळवुन अत्यंत कौशल्यपुर्ण तपास करून, भाषेची कोणतेही अडचण येवु न देता आरोपी नाना पाटेकर याचा ठाव ठिकाणा प्राप्त केला. मिळालेल्या माहिती नुसार सदर पथकाने शिवकाशी येथे सापळा रचुन आरोपी नाना पाटेकर यास ताब्यात घेतले.
आरोपी नाना शिवाजी पाटेकर यास दिनांक 04/02/2023 रोजी अटक करण्यात आली असुन त्यास मा. न्यायालया समोर हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक 08/02/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
नमुद उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. हिम्मत जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुहास जगताप, स्था.गु.शा, यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे यांचे पथकातील, सहापोउनि/श्रीकांत गायकवाड, पोहकाॅ/सलीम बागवान, हरिदास पांढरे, पोकाॅ/समर्थ गाजरे, चापोकाॅ/दिलीप थोरात, व पोना/ मोरे, सायबर पोलीस ठाणे यांनी बजावली आहे.