मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,कु.रुद्रांश शिंदे यांच्या वाढदिवसांनिमित्त पंढरपूर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन
पंढरपूर,जि.सोलापूर,दि.4 :- मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे अन् चि. कु.रुद्रांश श्रीकांत शिंदे या शिंदे घराण्यातील तीन पिढ्यांच्या सदस्यांच्या वाढदिवसांनिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे २ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख श्री.मंगेश चिवटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर तथा नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी प्रमुख पाहुणे अँड आशुतोष बडवे, विरेंद्रसिंह उत्पात, विनय मदन महाराज हरिदास यांनी दिप प्रज्वलन केलं.
याप्रसंगी स्थानिक नागरिक तसेच माघ यात्रेच्या निमित्ताने आलेल्या वारकऱ्यांची
नेत्र तपासणी, रक्तदाब तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी,
रक्त तपासणी करण्यात आली.
या शिबिराचा सुमारे १३०० लोकांनी लाभ घेतला. अनेकांनी यावेळी रक्तदान देखील केले. यावेळी सर्वांना मोफत औषधोपचार करण्यात आले. आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी वारकरी लोकांनी समन्वयक -पंढरपूर तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सौ.मनिषा प्रसाद वासकर यांचे शतश: आभार मानले. सौ.मनिषा वासकर यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. सौ.रेखा चंद्रराव व भारत मुढे यांनी कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन केले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी लाईफ लाईन हॉस्पिटल, सिव्हील हॉस्पिटल,विठ्ठल हॉस्पिटल मधील डॉक्टर,bनर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सूरज जम्मा (मोहोळ),रोहन बलक्षे (माढा), स्वप्नील गुजर (माळशिरस) हे आपल्या कक्षाच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.
शिबिराच्या दरम्यान ह्या भागातील वैद्यकीय क्षेत्र तथा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांचे आभार प्रदर्शन करतांना
ह.भ.प.राणा महाराज वासकर यांनी सौ. मनीषा वासकर आणि त्यांच्या रुग्णसेवकांना आवाहन केलं की,जिथे जिथे वारकऱ्यांचा नामसप्ताह असेल,तिथे तिथे आरोग्य शिबिरे आयोजित करावीत,जेणेकरून त्यांच्या आरोग्याची देखभाल होईल.
सामाजिक सेवेच्या भूमिकेतून सौ.मनिषा प्रसाद वासकर ह्या आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्याच्या समन्वयक म्हणून आरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत.
मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांचे आशिर्वाद,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची प्रेरणा अन् मंगेशभाऊ चिवटे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने माझ्या हातून रुग्णसेवेचे कार्य निरंतर चालू राहील असे मनोगत सौ. मनिषा वासकर यांनी यावेळी व्यक्त केले.
चि.रुद्रांशच्या वाढदिवसानिमित्त
त्याला विठुमाऊलीची फ्रेम तर
उपस्थित सर्वांना श्री विठ्ठल रुक्मिणी कॅलेंडर आणि जपमाळा भेट देण्यात आल्या.