अ.भा.रिपब्लिकन पक्षातर्फे मंगळवारी पुणे येथे आदरांजली सभेचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश इंगोले
पुणे-:मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता ताडीवाला रोड येथील (पुणे) माता रमाई आंबेडकर पुतळा येथे आदरांजली सभेचे आयोजन केले असल्याची माहिती पक्षाच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली नांगरे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीमध्ये माता रमाईचे मोठे योगदान असून रमाई च्या त्यागामुळेच भिमराव आंबेडकर बाबासाहेब झाले. आणि रमाई आंबेडकर कोट्यावधी लेकरांच्या आई झाल्या त्यांच्या त्यागाला सलाम करण्याकरिता सदर सभेचे आयोजन करण्यात आले असुन या सभेकरिता पक्षाचे प्रदेश सचिव डी.के. साखरे ,महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पद्मिनी शेवडे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमित ढवारे,महिला आघाडीच्या माया खरे ,पूजा चितारे, सांगली जिल्हा अध्यक्ष आप्पा कांबळे, जिल्हा महिला अध्यक्ष अनिता शिवशरण, शहर अध्यक्ष रोहित कांबळे, कोल्हापूर शहर अध्यक्ष संतोष मोरे ,सोलापूर जिल्हा अध्यक्ष समाधान कांबळे, जिल्हा महिला अध्यक्ष वैशाली चंदनशिवे आदि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती नांगरे यांनी दिली.