स्वेरी अभियांत्रिकीचा ‘सेट ऑन साईट इलेक्ट्रीकल प्रा.लि.’ व ‘एक्रेट अप्लायन्सेस प्रा.लि.’ सोबत सामंजस्य करार

0
स्वेरी अभियांत्रिकीचा ‘सेट ऑन साईट इलेक्ट्रीकल प्रा.लि.’ व ‘एक्रेट अप्लायन्सेस प्रा.लि.’ सोबत सामंजस्य करार

पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित अभियांत्रिकी पदवी व अभियांत्रिकी पदविका या महाविद्यालयांचा ‘सेट ऑन साईट इलेक्ट्रीकल प्रायव्हेट लिमिटेड व एक्रेट अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्यासोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
         औरंगाबाद मधील ‘सेट ऑन साईट इलेक्ट्रीकल प्रायव्हेट लिमिटेड व एक्रेट अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्यांसोबत स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकी व पदविका अभियांत्रिकी या दोन्ही महाविद्यालयांचा  सामंजस्य करार करण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून स्वेरीतील विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध गोष्टींसाठी मदत मिळणार आहे. औद्योगिक संस्थांच्या भेटीतून अभ्यास, प्रोजेक्ट, इंटर्नशिप, कन्सल्टंसी, संशोधन आणि विकास या करीता दोन्ही कंपन्यांची मदत होणार आहे. हे दोन्ही करार मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या दोन विभागाशी संबंधित आहेत.  विद्यार्थ्यांच्या हितासाठी असणाऱ्या विविध क्षेत्रातील संस्था आणि कंपन्यांसोबत स्वेरी अभियांत्रिकीचे सामंजस्य करार झालेले आहेत. यामध्ये कौशल्य विकास, उद्योजकता, स्पर्धा परीक्षा आदी संबंधित विविध संस्थांचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत मिळते. ‘सेट ऑन साईट इलेक्ट्रीकल प्रायव्हेट लिमिटेड व एक्रेट अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामानंद मोदानी व व्यवस्थापक किरण चव्हाण हे कंपनी तर्फे तर स्वेरीकडून संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, प्रा.अविनाश मोटे यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. यापुर्वी देखील स्वेरीचे विद्यार्थ्यांच्या हितासाठी  अनेक कंपन्यांसोबत  सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीस चालना मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा हा करार करण्यात आल्याने संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इन चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !