श्री विठ्ठल कारखान्यावर निमंत्रित संचालकांची निवड

0
श्री विठ्ठल कारखान्यावर निमंत्रित संचालकांची निवड

वेणुनगर, दि. ३० - वेणुनगर- गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे रविवार दि. २९.०१.२०२३ रोजी मा. संचालक मंडळाच्या सभेमध्ये कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा समजला जाणाऱ्या आपल्या कारखान्याला मार्गदर्शन व सल्ला मिळावा या उद्देशाने या संचालक मंडळावर निमंत्रित संचालक नियुक्त करण्याची आपल्या कारखान्याची प्रथा आहे असे सांगितले. याबाबत सर्व संचालक मंडळाचे एकमत होऊन पुढील मान्यवरांची निमंत्रित संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सर्वश्री धनाजी ज्ञानेश्वर खरात, रा. सोनके, सचिन अरूण शिंदे (पाटील), रा. आंबे, तानाजी विष्णु बागल, रा. गादेगांव, उमेश बाळु मोरे, रा. चळे, अंगद उध्दव चिखलकर, रा. पांढरेवाडी, अशोक महादेव घाडगे, रा. मुंढेवाडी, गणेश भिका ननवरे, रा. आव्हे, समाधान तुकाराम गाजरे, रा. शेळवे, ता. पंढरपूर यांना निमंत्रित संचालक म्हणून निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील व कारखान्याचे मार्गदर्शक श्री बी. पी. रोंगे सर यांनी केला. या निमंत्रित संचालकांच्या निवडीमुळे पंढरपूर तालुक्यामध्ये कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील यांनी दिलेले वचन पाळणारे चेअरमन असा विश्वास निर्माण होऊन आनंद व्यक्त होत आहे. या निवडीने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देणारा चेअरमन म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे.

सदर प्रसंगी बोलतांना कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील म्हणाले की, श्री विठ्ठल कारखान्याची निवडणुक ही आपली पहिलीच निवडणुक असल्यामुळे आपणास सहकार्य केलेल्या आपल्या श्री विठ्ठल परिवारातील तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढील येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, मार्केट कमिटी अशा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये निवडून आणून त्यांना सन्मानीत करून न्याय देण्याचे आश्वासन दिले.

तसेच कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२२-२३ चालु असुन आपले कारखान्यास ऊस पुरवठा सुरळीत होण्यासाठी दि.०१.०२.२०२३ पासून कारखान्याकडे गळीतास येणाऱ्या सर्व ऊसास प्रती मे. टन रू.१००/- ची वाढ देऊन पहिला हप्ता रु. २४०० /- (दि.०१.०२.२०२३ पासून) देणेचा निर्णय कारखान्याचे मा. संचालक मंडळाने याप्रसंगी घेतलेला आहे.

यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक श्री बी. पी. रोंगे सर तसेच व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता बब्रुवाहन रोंगे, संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, विठ्ठल रणदिवे, महेश खटके, दशरथ जाधव, अशोक तोंडले व तुकाराम मस्के, कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, एम. एस. सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, तसेच कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !