खा.अरविंद सावंत यांच्या ट्रस्ट च्या वतीने पंढरपूर मधील सामाजिक संस्थेस ॲम्बुलन्स भेट

0
खा.अरविंद सावंत यांच्या ट्रस्ट च्या वतीने पंढरपूर मधील सामाजिक संस्थेस ॲम्बुलन्स भेट

आज शनिवार दिनांक २८/०१/२०२३ माघ शु ०७ रथसप्तमी रोजी मातोश्री मुंबई येथे मा. आदित्यजी उध्दवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख यांच्या शुभहस्ते मा. खा अरविंदजी (भाई) सावंत शिवसेना नेते, प्रवक्ते व अध्यक्ष जाणीव ट्रस्ट यांचे वतीने  शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती श्री संभाजी शिंदे यांच्या धर्मवीर संभाजी राजे कला व क्रिडा मंडळ संचलीत भाळवणी या सामाजिक संस्थेस रूग्णसेवेसाठी करत आसलेल्या कार्याबद्दल अधेक तत्परतेने रूग्णांना सेवा देणे कामी रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चे लोकार्पण आदरणीय शिवसेना नेते - आमदार श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या शुभहस्ते 'मातोश्री' येथे करण्यात आले. त्यानंत मा. श्री संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांचे वतीने मा. आदित्यजी उध्दवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख व मा. खा अरविंदजी (भाई) सावंत शिवसेना नेते, प्रवक्ते व अध्यक्ष जाणीव ट्रस्ट यांचा सत्कार श्री विठ्ठलाचे उपरणे, दैनंदिनी व कॅलेंडर देऊन करण्यात आला.
या समयी श्री. दिलीप जाधव (संयुक्त सरचिटणीस - भारतीय कामगार सेना); श्री. प्रकाश शिरवाडकर (कार्याध्यक्ष - मटेनि कामगार संघ); श्री. दिलीप (बाळा) साटम (सरचिटणीस - मटेनि स्था. लो. समिती); श्री. दत्तात्रय भोसले (सह सरचिटणीस - मटेनि कामगार संघ); श्री. सुधाकर सावंत (उपाध्यक्ष - मटेनि स्था. लो. समिती); श्रीम. कल्याणी सावंत (सचिव - स्था. लो. समिती महासंघ); श्रीम. स्मिता तेंडुलकर (सचिव - स्था. लो. समिती महासंघ); श्री. सतिश घाडी (क्षेत्रीय  संघटक सचिव - मटेनि कामगार संघ); श्री. दिवाकर शेट्टे (सचिव मटेनि - स्था. लो. समिती) आदि मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !