पंढरपुर शहर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, २लाख साठ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त.
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची सोन्याचे दागिने चोरी, मोटारसायकल तसेच मोबाईल चोरीचे गुन्हे पडकीस आणुन एकूण २,६०,००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्तीची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर १) गुरनं ६९१ / २०२२ भादवि कलम ३९२ प्रमाणे २) ६९०/२०२२ भादवि कलम ३७९३) ८६६/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे ४) ८७४ / २०२२ भादवि कलम ३७९५) ५३८ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे दाखल असुन पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे वरील सर्व गुन्हे उघडकीस आणुन खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
वाशिम येथील भाविक फिर्यादी लक्ष्मण कोल्हे हे पंढरपुर येथे देवदर्शनासाठी आले असता व ते दर्शन घेवुन गावी जाणेकरीता माघारी जाणेकरीता एस.टी. बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे गळ्यातील रु.९०,०००/- किंमतीचा २० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप आरोपीने जबरीने चोरून नेला होता. सदर वरनमुद वर्णनाचा मुद्देमाल आरोपीताकडुन जप्त करणेत आलेला आहे.
फिर्यादी महिला नागबाई प्रभु गोगाव रा. पंढरपुर या जुने बस स्टैंड येथे बसमध्ये चढत असताना रु ५०,०००/- किंमतीचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणि मंगळसूत्र चोरटयाने चोरून नेले होते. सदर वर नमुद वर्णनाचा मुद्देमाल आरोपीताकडुन जप्त करणेत आलेला आहे.
वैशाली कैलास तोडकरी रा. मोडनिंब ता. माढा जि.सोलापुर या बस स्टँड येथे
बसमध्ये चढत असताना रु ७०,०००/- किंमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण
चोरटयाने चोरून नेले होते. सदर वरनमुद वर्णनाचा मुद्देमाल आरोपीताकडुन जप्त करणेत
आलेला आहे.
सदरचे गुन्हयामधील फिर्यादी हे पंढरपुर येथे देवदर्शनाकरीता पंढरपुर येथे आले असताना त्यांचेमालकीची रू. ३०,०००/- किंमतीची एक ग्लॅमर कंपनीची मोटार सायकल चोरीस गेली होती. सदरची मोटारसायकल गुन्हयाचे तपासात आरोपीकडुन जप्त करणेत आलेली आहे.
फिर्यादी उध्दव शिंदे रा. निफाड जि. नाशिक हे पंढरपुर येथे कार्तिकवारी करीता पंढरपुर येथे आले असताना त्यांचे मालकीची रू.२०,०००/- किंमतीची एक एक होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल पंढरपुर येथील रेल्वे मैदान येथुन चोरीस गेली होती. सदरची मोटारसायकल गुन्हयाचे तपासात आरोपीकडुन जप्त करणेत आलेली आहे.
वरील ०५ गुन्हयामध्ये ०२ आरोपीतांकडुन एकुण २ मोटारसायकली तसेच एकुण ५३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा २,६०,०००/- रू किमंतीचा चोरी गेलेला मुद्देमाल गुन्हे उघडकीस आणुन जप्त करणेत आलेला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री शिरीष सरदेशपांडे सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री हिमंतराव जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, श्री. विक्रम कदम सो व श्री. अरूण फुगे साो, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि चिमणाजी केंद्रे,पोसई दत्तात्रय आसबे, सपोको नागेश कदम, राजेश गोसावी, पोहवा शरद कदम, सुरज हेंबाडे, बिपीनचंद्र ढेरे, पोलीस नाईक सचिन इंगळे, सुनिल बनसोडे, सचिन हेंबाडे, दादा माने, राकेश लोहार, शहाजी मंडले व सायबर सेलचे पोकॉ अन्दर आतार यांनी केली आहे.या गुन्ह्यात शहर पोलिसांनी आतिश उर्फ महादेव हणमंत सगर,वय ३२, रा.३२ खोल्या, संत पेठ,पंढरपूर,आणि सोमनाथ शंकर काळे,वय२८, रा. वेळापूर, ता.माळशिरस यांना अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.