श्रीनाथ विद्यालय सोनके येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले
जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश इंगोले
श्रीनाथ विद्यालय सोनके ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर आज सोमवार दिनांक 23 /1 /2023 रोजी क्रांतिकारक, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे मॅडम यांनी केले. विद्यालयातील ज्येष्ठ सहशिक्षक श्री चव्हाण आर आर जी यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे बद्दल आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.