शिवसेना व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची आज घोषणा

0

शिवसेना व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची आज घोषणा

मुंबई प्रतिनिधी

गेले अनेक दिवस चर्चेत असलेली शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा सोमवारी करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सोमवारी दुपारी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

त्यात नव्या युतीची घोषणा केली जाईल. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेसाठी ठाकरे हे 'आंबेडकर भवना'त जाणार आहेत.

रामदास आठवले यांना बरोबर घेत शिवसेनेने शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग यापूर्वीही केला होता. आठवले भाजपबरोबर गेल्याने शिवसेनेने आता प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्याचा महानगरपालिका निवडणुकीत फायदा करून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !