महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या व सिटू कामगार संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील अनुकंपा धारकांना नियुक्ती मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या व   सिटू कामगार संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील अनुकंपा धारकांना नियुक्ती  मिळावी म्हणून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

दि 25 डिसेंबर  2023 पर्यंत अनुकंपाधारकांना नियुक्ती न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुकंपा धारक कुटुंबियांसमवेत आत्मदहन करणार
 महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील ३५ अनुकंपाधारकांना त्वरित सेवेत नियुक्ती द्यावी म्हणून महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष कॉ. सिद्धाप्पा कलशेट्टी, कामगार नेते महादेव आदापुरे, नानासाहेब वाघमारे, शिवाजीराव पाटील,शरद वाघमारे, धनराज कांबळे, भीम किर्गल, खाजाप्पा दादानवरू यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करून  धरणे आंदोलन करण्यात आले  यावेळी  बोलताना अँड.सुनिल वाळूजकर  यांनी सांगितले की, सन २००४ पासून सोलापूर जिल्ह्यातील विविध नगरपालिकेमधील अनेक कर्मचारी मयत झाले आहेत अशा मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा योजनेखाली त्वरित सेवेत नियुक्ती द्यावी म्हणून शासनाने वेळोवेळी निर्देश दिलेले असताना सुद्धा अद्याप पर्यंत गेल्या  दहा ते पंधरा वर्षांपासून अनेक अनुकंपाधारक आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत 
शासनाने जिल्हास्तरावर याबाबत प्रतीक्षा सूची ठेवण्याबाबत निर्णय दिले आहेत व नगरपालिका अथवा  इतर  विभागांमध्ये रिक्त जागा असल्यास त्या जागेवर यांची समावेशन करण्याबाबत ही सुचना दिलेल्या आहेत असे असताना प्रत्येक वर्षी केवळ सेवानिष्ठतेनुसार अनुकंपा प्रतीक्षा सूची यादी तयार केली जाते परंतु प्रत्यक्षात एकही अनुकंपाधारक यांना न्याय दिला जात नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय समोर 23, 24, 25 जानेवारी 2023  रोजी धरणे आंदोलन करण्यात आले तसेच 25 जानेवारी 2023 पर्यंत अनुकंपाची नियुक्ती न झाल्यास 26 जानेवारी रोजी  सर्व अनुकंपाधारक आपल्या कुटुंबीया समवेत आत्मदहन करणार असल्याची माहिती यावेळी अँड. सुनिल वाळूजकर व कॉ. सिद्धाप्पा कलशेट्टी  यांनी दिली यावेळी सर्व अनुकंपाधारक उपस्थित होते
 अँड.सुनिल वाळुजकर                                                         जनरल सेक्रेटरी
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !