निंबोणी येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयात मंजूर - आ आवताडे यांची माहिती
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाच्या मध्यावर असलेल्या निंबोणी येथे चांगल्या दवाखान्याची आवश्यकता होती ती गरज ओळखून 30 खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचा पाठपुरावा सुरू होता त्यानुसार शिंदे फडणवीस सरकारने या रुग्णालयाला मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय आज पारित करण्यात आला असल्याची माहिती आ समाधान आवताडे यांनी दिली आहे. यामुळे तालुक्याच्या दक्षिण भागातील नागरिकांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.आ आवताडे म्हणाले की, सतत या रुग्णालयाचा पाठपुरावा केल्याने विशेष बाब म्हणून याला मान्यता देण्यात आली आहे याठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी या भागातील नागरिकांची मागणी होती परंतु शासन स्तरावरून सातत्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला होता .दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये दक्षिण भागातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता.पोटनिवडणुकीच्या निकालानंतर तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना समक्ष भेटून निवेदन दिले व विधानसभेत यावर प्रश्न देखील उपस्थित केला होता त्यावेळी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याची आश्वासन दिले होते सहा महिन्यात राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या मध्ये आरोग्यमंत्री पदाचा पदभार तानाजी सावंत यांनी घेतला त्यांचे मंगळवेढ्याशी संबंध आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साखर कारखान्याच्या शुभारंभ प्रसंगी नंदुर येथे आल्यावर देखील या प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती त्यामुळे या प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळाला आहे.सध्या दक्षिण भागातील वाढलेले औद्योगीकरण व वाढती लोकसंख्या विचार करता हे ग्रामीण रुग्णालय या भागातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे असल्याचे आ आवताडे यांनी सांगितले.
दक्षिण भागातील सीमा वरती गावातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधेसाठी मंगळवेढा सोलापूर पंढरपूरला जावे लागणार होते याची जाणीव आ.समाधान आवताडे यांना झाली व मतदार संघातील जनतेची सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून काम केले व रुग्णालय मंजूर करून आणले आता या नव्या ग्रामीण रुग्णालयामुळे त्यांना या ठिकाणी चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होणार आहे
भारत ढगे, मा. सरपंच, निंबोणी