गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ; सातारा न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश
तसेच सोशल मीडियावर देखील गौतमीच्या लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, आता अशातच गौतमीच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याची बातमी समोर येत आहे.
मागील अनेक दिवसांपासून अनेकजण गौतमीच्या लावणीवर टीका करत आहेत. प्रतिभा शेलार यांनी देखील गौतमी तिच्या नृत्यात अश्लील हावाभाव करत असल्याचे आरोप करत सातारा न्यायालयात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आता त्यांच्या तक्राराची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रतिभा शेलार यांनी तक्रार दाखल करत म्हणाल्या होत्या की, अश्लील हावाभाव करणे, शॉर्ट कपडे घालून नृत्य करणे हे प्रकार लोककलेत आणि लावणीत नाहीत. परंतु अलीकडे काहीजण लवकर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अश्लील नृत्य करतात आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशा प्रकारचे अश्लील नृत्य करुन ते स्वतःला लोककलावंत म्हणवतात. असे आरोप प्रतिभा शेलार यांनी गौतमीवर केला आहे.
गौतमीने आरोप फेटाळले
प्रतिभा शेलार यांनी केलेले आरोप गौतमीने फेटाळले आहेत. गौतमी म्हणाली की, "मी आधी या चूका केल्या होत्या परंतु मी आता यातील कोणतीही चूक करत नाही. मी जर चूक केली तर तुम्ही माझ्याविरोधात गुन्हा दाखल करु शकता. परंतु काहीही चूक नसताना उगाच माझ्यावर आरोप करुन माझे कार्यक्रम बंद करण्याची मागणी करणं अन्यायकारक आहे."