हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त जुना कराड नाका, गाताडे प्लॉट येथे भव्य हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला.
जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश इंगोले
या कार्यक्रमाची सुरुवात स्व.बाळासाहेब ठाकरे व स्व.माँ. साहेबांच्या प्रतिमेचे पुजन तसेच द्विप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.सौ.मैत्रेयीताई मंदार केसकर यांच्या शुभ हस्ते तसेच सौ.अमृताताई प्रणव परिचारक, सौ.चंचलाताई काकासाहेब बुराडे, सौ अमृताताई लंकेश बुराडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले.
या कार्यक्रमास सौ.शैलाताई सलगर, सौ.संगीताताई वाघ, सौ.आशाताई बेद्रेकर, सौ.स्वातीताई बागडे, सौ.सुवर्णाताई ढाळे, सौ.वैष्णवीताई अष्टेकर, सौ.सिमाताई जोजारे, सौ.सारीका ताई टाक, सौ.निशा बागडे, सौ.सुखदा टाक, सौ.अपर्णा बागडे, सौ.रुपाली भुजंगे, सौ.रेणुका पवार, सौ शुभद्रा वरपे, सौ संगीता पवार, सौ.मिनल अष्टेकर, सौ.सुनिता अष्टेकर यांच्या सह बहुसंख्य महीला भगिनीं सोबत हा समारंभ पंढरपूर शहरातील व उपनगरभागातील भगिनी मातांसोबत उत्साहात पार पाडला.
समाजातील सर्व थरांच्या स्त्रियांत विशेषप्रसंगी स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ करण्याची पद्धत आजतागायत सुरू आहे. हे समारंभ म्हणजे गृहिणीपूजन, आदरसत्कार व स्नेहमीलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहे.
मकरसंक्रांतीला हळदी कुंकू समारंभ सर्वच करतात पण समस्त स्त्री शक्तीचा सन्मान करुन आम्ही संक्रांत साजरी केली.
स्त्रियांनी या समारंभात उपस्थित राहून एकमेकींना वाण देऊन या सणाचा आनंद द्विगुणित केला. हा आगळावेगळा,भव्य दिव्य आणि अनोखा असा हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला.
महिलांनी मोठया उत्साहाने आपली उपस्थिती दाखवून समारंभाची शोभा वाढवली त्याबद्दल आलेल्या सर्व माता भगिनींचे आभार कार्यक्रमा च्या आयोजक सौ.अमृताताई लंकेश बुराडे यांनी मानले.