पंढरपूर सायकलर्स क्लबच्या मेंबर्सनी करकंब येथील ऐतिहासिक विहीर केली स्वच्छ.

0
पंढरपूर सायकलर्स क्लबच्या मेंबर्सनी करकंब येथील ऐतिहासिक विहीर केली स्वच्छ. 

पंढरपूर(प्रतिनिधी)

पंढरपूर सायकलर्स  क्लब यांच्या वतीने अनोखा उपक्रम.. राबविण्यात आला आहे

सायकलींग तर व्यायामासाठी सगळेच करतात पण त्याही पलीकडे जाऊन आपण निसर्गाचे,पर्यावरणाचे काहीतरी देण लागतो म्हणूनच "पंढरपूर सायकलर्स क्लब,पंढरपूर" तर्फे रविवार दि २२ जानेवारी रोजी  ५० कि.मि.सायकल राईडचे आयोजन पंढरपूर-करकंब-पंढरपूर असे करण्यात आले.याच राईड दरम्यान करकंब येथील पुरातण बारव स्वच्छता करण्यात आली.
भारतात पाण्याची एक 'इको सिस्टीम' आहे,पण त्यातल्या पारंपरिक जलस्रोतांचा वापर थांबला आहे.बारवांचं पुनरुज्ज्वीन केल्यानं लोकांना हे पारंपरिक स्रोत आणि त्यावर आधारलेलं समाजजीवन परत मिळेल.मोठ्या विहिरींची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पाहता, पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी त्या महत्त्वाच्या ठरतील,"
पुर्वजांनी जलव्यवस्थापन करीत असताना बाराही महीने पाण्याची गरज खात्रीने भागविणारे जलाशय म्हणजे "बारव" ची निर्मिती केली.सद्य परीस्थीतीत बारवची स्थिती अतिशय हालाकीची आहे.त्यांच्या जतना साठी त्यांना स्वच्छ करून हा वारसा आपण जपला पाहीजे.हे काम शासनाने करण्या समाजाकडून झाल्यास खुप आत्मियतेने होते. नाहीतर हा ऎतीहासीक वारसा आपल्या हातून गेल्याशिवाय राहणार नाही.

समस्त करकंबकरांना या ऎतीहासीक बारवेचे महत्व कळावे त्यांनी ते गांभिर्याने घ्यावे व येणा-या काळात हि बारव अशीच स्वच्छ राहून त्यातील झरे स्वच्छ झाल्यास या मध्ये असलेल्या पाण्याचा उपयोग समस्त करकंब करांची तहान भागविण्यात होईल हे निश्चित.

करकंब येथील जागर स्वच्छता अभियान टिम व पंढरपूर सायकलर्स क्लब पंढरपूर च्या  ४० पुरुष व १५ महीला उत्साही रायडर्सने या बारव स्वच्छता मोहीमेत  सहभाग घेतला शिवाय याच ऎतीहासीक मोहीमेची आठवण म्हणून करकंब येथील स्मशानभूमी मध्ये "बहावा" चे वृक्षारोपन केले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !