वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युतीचा अकलूजमध्ये जल्लोष !
जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश इंगोले
अकलूज - वंचित बहुजन आघाडी व युवासेना - शिवसेना यांची महाराष्ट्रात युतीची घोषणा मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे व प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे केली या घटनेने तमाम महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याचे वातावरण दिसून आले.
याचं पार्श्वभूमीवर अकलूज येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या युतीचे स्वागत करीत मोठी फाटाक्याची अतिशबाजी व हलगीचा तालात घोषणाबाजी करत व एकमेकांना जिलेबी भरवून आनंद साजरा केला.या वेळी वंचितचे व शिवसेनेचे दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.त्यावेळी वंचितचे माळशिरस ता.अध्यक्ष अभिजित गायकवाड, शिवसेनेचे ज्येष्ठ महादेव बंडगर ( ग्राहक संरक्षण कक्ष जि.प्रमुख),शेखरभैय्या खिलारे(अकलूज शहरप्रमुख),स्वप्नील वाघमारे(युवासेना राज्य सचिव),गणेश इंगळे (युवासेना जिल्हा प्रमुख),नौशाद शिकलकर (जिल्हा उपाध्यक्ष वंचीत),भैय्या राऊत (जुने कडवे शिवसैनिक),पांडुरंग केंगार (जिल्हा संघटक वंचित),रवी कांबळे(जिल्हा कार्यकारणी सदस्य),दत्ताभाऊ साळुंखे (उप.तालुका प्रमुख माळशिरस),विजयभाऊ कोकने,उमेश जाधव (शिवसेना उप.शहरप्रमुख अकलूज)विकास दळवी (तालुका संघटक वंचित),सागर वाघमारे (ता.संपर्कप्रमुख वंचीत),सुनील कांबळे(अकलूज शहर अध्यक्ष वंचित)मनोज जगताप (अकलूज शहर उपाध्यक्ष वंचीत),सागर जगताप (शहर महासचिव वंचीत)शंकर पाटील(शहर संघटक वंचित), सूनका जाधव(शहर संघटक),बाळासाहेब गायकवाड (प्रसिध्दी प्रमुख वंचीत),मिलिंद मोरे (शिवसैनिक),सतीश कुलाळ(शिवसैनिक),सुरेश मोटे(श्रीपुर शहराध्यक्ष वंचित),कारण भाऊ कांबळे(शाखाप्रमुख युवासेना),किरण भांगे,शिवदत्त नामदास,विशाल गवळी,पप्पू पवार,शिवराम गायकवाड,आकाश पराडे,सुजित गायकवाड,सागर झेंडे,आदर्श गायकवाड,युवराज गायकवाड,अजय कांबळे,जय खरे, इत्यादी वंचित बहुजन आघाडी,शिवसेना,युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार शेखरभैय्या खिलारे,अभिजीत गायकवाड यांनी मानले.