सिकंदर ठरला ‘भीमा केसरी’चा मानकरी; महाडिक परिवाराकडून अभूतपूर्व.. अविश्वसनीय.. भव्यदिव्य आयोजन
विश्वराज महाडिक यांचं परफेक्ट नियोजन.. कुस्तीप्रेमींच्या डोळ्याच पारणं फिटलं
सहकारमंत्री अमित शहांसोबत दिल्लीत बैठक.. खासदार महाडिकांनी व्हिडीओ कॉलद्वारे साधला संवाद
खा. महाडिकांच्या अनुपस्थितीत तिन्ही भावांनी जबाबदारी पेलली.. भव्य आयोजनाने कुस्तीप्रेमींची जिंकली मने
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या व खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'भीमा केसरी' चा 'किताब सिकंदर शेखने पटकावला. सिकंदर शेखने पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला आस्मान दाखवलं. सोबतच गणेश जगताप हा 'भीमा कामगार केसरी', महेंद्र गायकवाड हा 'भीमा वाहतुक केसरी', माऊली जमदाडे हा 'भीमा साखर केसरी' व संतोष जगताप हा 'भीमा सभासद केसरी' या किताबाचे मानकरी ठरले. या पाच प्रमुख कुस्त्यांसाठी भीमा केसरी चांदीची गदा, सन्मान चिन्ह यांसह ९ लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. याशिवाय ५०० ते १५००० रकमेच्या बक्षिसासाठी राज्यभरातून आलेल्या इतर पहिलवानांच्या ४२१ कुस्त्यांसाठी एकूण ७ लाख रुपयांचं बक्षीस रोख स्वरूपात देण्यात आले.
विश्वराज महाडिक यांचं परफेक्ट नियोजन.. अन हजारो कुस्तीप्रेमींची उपस्थिती
सोलापूर जिल्ह्यात प्रथमच इतक्या नेटक्या व भव्य पद्धतीने कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येक कुस्तीप्रेमीला फडातील कुस्ती पाहता यावी यासाठी स्टेडीयम पद्धतीचे स्टॅन्ड व लाईट व्यवस्था करण्यात आली होती. भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक हे संपूर्ण टीमसह स्वतः या स्पर्धेच नियोजन पाहत होते. १२००० ते १५००० इतक्या मोठ्या प्रमाणातील कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीने संपूर्ण माहोल कुस्तीमय झाला होता. विश्वराज महाडिक यांचं परफेक्ट नियोजन आणि चपलख कुस्त्या यामुळे हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचं पारणं फिटलं.
खासदार धनंजय महाडिक यांचा व्हिडीओ कॉलद्वारे संवाद
दिल्ली येथे केंद्रीय सहकारमंत्री यांच्या दालनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याउपस्थितीत साखर कारखानदारी व सहकार क्षेत्राबाबत धोरणात्मक विषयांवर चर्चेसाठी अत्यंत महत्वपूर्ण बैठकबोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी खासदार महाडिक दिल्लीतच होते त्यामुळे त्यांना या स्पर्धेला उपस्थित राहता आले नाही. त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाडिक कुटुंबीय हे पहिल्यापासूनच कुस्तीप्रेमी असून त्यातूनच प्रेरणा घेऊन हे आयोजन केले आहे. विश्वराज हे त्यांच्या आजोबांप्रमाणेच कुस्तीसाठी योगदान देत असल्याचे सांगत भीमराव दादांनी आयोजित केलेल्या स्पर्धांची आठवण खासदार महाडिक यांनी जागवली. खासदार महाडिक यांच्या अनुपस्थित होत असलेल्या या स्पर्धेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी पृथ्वीराज महाडिक, भीमाचे चेअरमन विश्वराज महाडिक व विश्वराज महाडिक हि तीनही भावंडं सर्वच आघाड्यांवर स्वतः लक्ष देऊन काम पाहत होती. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत, कुस्तीप्रेमींची व्यवस्था, वस्ताद व मल्ल यांचं मानपान याची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी तिघे भाऊ झटत होते.
जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते या स्पर्धेसाठी उपस्थित होते.