दि .पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड पंढरपूरच्या नूतन चेअरमन पदी सतीश दादासाहेब मुळे तर व्हॉइस चेअरमन पदी माधुरी अभय जोशी यांची बिनविरोध निवड

0
दि . पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड पंढरपूरच्या नूतन चेअरमन पदी सतीश दादासाहेब मुळे तर व्हॉइस चेअरमन पदी माधुरी अभय जोशी यांची बिनविरोध निवड

दि.पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड पंढरपूरचे नूतन चेअरमन पदी सतीश दादासाहेब मुळे तर व्हॉइस चेअरमन पदी माधुरी अभय जोशी यांचे बिनविरोध निवड झाली यावेळी बँकेचे माजी चेअरमन तथा मा.आमदार श्री प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड पंढरपूरचे मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सण 2022-23 ते 2027-28 बिनविरोध पार पडली आहे.

आज दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था पंढरपूरचे श्री.पी.सी दुरगुडे मार्गदर्शनाखाली सदर निवडणूक पार पडली. जर्मन पदासाठी श्री सतीश दादासो मुळे तर व्हाईस चेअरमन पदासाठी सौ माधुरी अभय जोशी यांचे एक-एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे प्राधिकृत अधिकारी श्री दुरगुडे यांनी जाहीर केले.
यावेळी युटोपियन शुगरचे चेअरमन श्री उमेश परिचारक, युवक नेते प्रणव परिचारक, नूतन संचालक राजाराम परिचारक, रजनीश कवठेकर, पांडुरंग घंटी शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, अमित मांगले, अनंत कटप, गणेश सिंघण, ऋषिकेश उत्पात, व्यंकटेश कौलवार, डॉक्टर संगीता पाटील, मनोज सुरवसे, अनिल अभंगराव, गजेंद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !