सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२६ : चिंचणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Maharastra now 24
0

  सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२६ : चिंचणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

पंढरपूर | प्रतिनिधी

एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पांतर्गत चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र व सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत चिंचणी येथे विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यटनविषयक कार्यक्रम पार पडणार आहेत.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता उद्घाटन प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी बाल चित्रपट महोत्सव, निबंध स्पर्धा आणि कवी संमेलन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

📅 महोत्सवातील प्रमुख कार्यक्रम

२७ सप्टेंबर: उद्घाटन प्रभात फेरी — सकाळी ८.३० वा.

२८ सप्टेंबर: बाल चित्रपट महोत्सव — सकाळी ८.३० ते ०५ वा.

२९ सप्टेंबर: निबंध स्पर्धा — सकाळी १० ते ०५ वा.

३० सप्टेंबर: कवी संमेलन — सायं. ६ ते १० वा.

१ ऑक्टोबर: महिलांचे पारंपरिक खेळ — दुपारी २ ते ६ वा.

२ ऑक्टोबर: वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व परिसंवाद — सकाळी १० ते ०५ वा.

महोत्सवादरम्यान बचत गटांच्या माध्यमातून बनविलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल, पर्यटकांसाठी जेवणावर विशेष सवलत तसेच स्विमिंग टँकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याशिवाय पर्यटकांसाठी बैलगाडी फेरी आणि ई-कार सफारी यांसारख्या विशेष सुविधाही ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामीण पर्यटनाला चालना देतानाच स्थानिक कला, खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण जीवनशैली पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.

चिंचणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे होणाऱ्या या महोत्सवात नागरिकांनी आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क: 9860959565 | 9970524080 | 9970804470 | 9764755090

  • Newer

    सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२६ : चिंचणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)