कल्याणच्या आचार्य विजय महाजन यांना वृंदावन येथे "राधारानी कृपा कटाक्ष श्रेष्ठ विद्वान सन्मान - 2026"
कल्याण / वृंदावन (प्रतिनिधी) दि. 20 सप्टेंबर 2026 -
महर्षि वेदव्यास वेदप्रचार अनुसंधान गुरुकुलम्, वृंदावन (संस्थापक - श्री अजय श्याम नंदी जी) व ऑल इंडिया फ्लौदी एस्ट्रोलॉजिकल रिसर्च सोसायटी (रजि.), कोटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रिदिवसीय द्वादश विश्व ज्योतिष, ऑकल्ट, वास्तु, आयुर्वेद, योग एवं वेद महासम्मेलन श्रीमती राधारानी महारानी यांच्या जन्मोत्सव (राधाष्टमी) निमित्त दि. 18 ते 20 सप्टेंबर 2026 रोजी श्री कुंज बिहारी सेवा धाम, रुक्मणी विहार, छटीकरा रोड, वृंदावन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या आंतरराष्ट्रीय महासम्मेलनामध्ये कल्याण-डोंबिवलीचे सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य, वास्तुतज्ज्ञ, लामाफेरा व न्युमरॉलॉजी ट्रेनर आणि नॅचरोपॅथ *आचार्य विजय बाळकृष्ण महाजन, कल्याण (मुंबई)* यांना ज्योतिष, तंत्र, वास्तु, अंक विद्या, योग, आयुर्वेद, कर्मकांड व भारतीय प्राच्य विद्या क्षेत्रातील 30वर्षांहून अधिक काळाच्या समर्पित सेवेबद्दल 'राधारानी कृपा कटाक्ष श्रेष्ठ विद्वान सन्मान - 2026'
ने सन्मानित करण्यात आले.
त्यांनी या सम्मेलनामध्ये सादर केलेल्या संशोधनपूर्ण शोधपत्राच्या आधारावर त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली. आयोजक *श्री अजय श्याम नंदी जी* यांनी त्यांचा गौरव करताना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांनी आपले वैदिक अनुसंधान चालू ठेवावे आणि आपल्या जिल्ह्यात किमान 5 वेद विद्यालयांची स्थापना करण्यासाठी विद्वानांना प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला दिल्लीचे प्रसिद्ध नाडी ज्योतिषाचार्य श्री उमंग तनेजा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. देशभरातून आलेले विद्वान, संत आणि संशोधक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या सन्मानामुळे कल्याण-डोंबिवलीच्या अध्यात्मिक व ज्योतिष क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.




