ग्रामविकासाची वारी पंढरीच्या दारी; वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाकडून व्यापक सुविधा

Maharastra now 24
0
ग्रामविकासाची वारी पंढरीच्या दारी; वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाकडून व्यापक सुविधा

पंढरपूर, प्रतिनिधी : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सोयी, सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे "ग्रामविकासाची वारी, पंढरीच्या दारी" हा विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांसाठी सुविधा केंद्र, तंबू निवारा, स्वच्छतागृहे, महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहे, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था, आरोग्य तपासणी, फिरते दवाखाने, मुख्यमंत्री आरोग्य रथ, विश्रांती केंद्र, दिशादर्शक फलक, आपत्ती व्यवस्थापन पथके, प्रकाश व्यवस्था आणि परिसर स्वच्छता अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
वारी मार्गावरील ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि प्रशासनातील विविध विभागांच्या समन्वयातून या सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या असून वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत.
"वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा" या भावनेतून शासनाने केलेल्या या नियोजनामुळे यंदाची आषाढी वारी अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त होण्यास मदत होत असल्याची भावना वारकरी व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)