पत्रकारांनी प्रामाणिक पणा,सचोटी, नीतिमत्ता ही त्रिसूत्री जपली पाहिजे.-श्री बाळासाहेब बडवे.
पंढरपूर (प्रतिनिधी) प्रामाणिकपणा,सचोटी, आणि नीतिमत्ता या तीन गोष्टीची जाणीव पत्रकारांनी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्री बाळासाहेब बडवे यांनी केले. पंढरपूर सुरक्षा समितीच्या वतीने शुक्रवार दि६ जानेवारी रोजी योग भवन, भक्तिमार्ग येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दीन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे तहसीलदार श्री सुशील बेल्हेकर, पंढरपूर नगरपालिकेचे उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर, पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य अध्यक्ष श्री यशवंत पवार, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतनाना देशमुख, शहराध्यक्ष दत्ताजी पाटील, प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे, तालुकाध्यक्ष तानाजी जाधव उप माहिती अधिकारी अविनाश गरगडे, तलाठी राजेंद्र वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री बडवे म्हणाले आजच्या काळातील आणि पूर्वीच्या काळातील पत्रकारितेत खूप फरक आहे. आजच्या पत्रकारितेत प्रामाणिक लोक खूप कमी राहिले आहेत. सध्या अनेक युवक धडाडीने या क्षेत्रात येत आहेत, पत्रकारिता सजग असल्याने भ्रष्टाचाराला पायबंद लागला आहे.सर्वसामान्य माणसाला मस्तवाल अधिकाऱ्यांमुळे अनेक यातना भोगाव्या लागतात. सर्वसामान्य लोकांच्या वेदना सरकार दरबारी पोचविण्यासाठी वृत्तपत्रं प्रभावी माध्यम आहे. पत्रकारिता हे एक वेगळे व्रत असून या व्रताचे पालन केले तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, आगरकर यांचे स्वप्न पूर्ण होईल.पत्रकारांनी नितीमुल्याना तडा जाईल असे वागू नये. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे आक्रोश मांडा.
सर्व पत्रकारांनी एकसंध राहून कार्य केले तर समाजात मान आणि किंमत मिळेल लाचारी सोडून पत्रकारांनी स्वाभिमानी राहून कार्य केले पाहिजे असे श्री बाळासाहेब बडवे म्हणाले. प्रमुख पाहुणे तहसीलदार सुशील बेल्हेकर म्हणाले, भारतात लोकशाही आहे ती पत्रकारांच्या भरीव योगदानामुळे समाजघटकांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्याचे काम प्रभावीपणे मांडण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे.यावेळी श्री यशवंत पवार, वसंत नाना देशमुख, रामचंद्र सरवदे, सुनील वाळूजकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळ उपाध्यक्ष रफीक आतार, जिल्हा कार्याध्यक्ष रवी शेवडे,
कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल, खजिनदार चैतन्य उत्पात,सचिव बाहुबली जैन,प्रसिद्धीप्रमुख रामकृष्ण बिडकर, शहर संपर्क प्रमुख नागेश काळे, पंढरपूर विभाग प्रमुख विरेंद्र सिंह उत्पात,लखन साळुंखे, विठ्ठल जाधव, सह सचिव विश्वास पाटील, ज्येष्ठ पत्रकार अशोक डोळ.सह खजिनदार प्रकाश इंगोले, ता.उप अध्यक्ष नामदेव लकडे, विभागीय संपर्क प्रमुख प्रशांत माळवदे,विजयकुमार मोटे, ता.कार्याध्यक्ष संतोष कांबळे,राहुल रणदिवे,अमर कांबळे,अशोक पवार,तानाजी सुतकर, गणेश देशमुख, खानसाब मुलांनी,अमोल गुरव,नितिन कोळेकर,धिरज साळुंखे, गणेश चंदनशिवे,विकास सरवळे, सचिन दळवी,ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण शहा,अजित देशपांडे यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शनी महाराज घुले व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन रवी शेवडे यांनी केले. आभार प्रशांत माळवदे यांनी व्यक्त केले.