आय.पी.एस.अधिकारी श्री. देवेनजी भारती यांची "विशेष पोलिस आयुक्त मुंबई" या पदावर नियुक्ती
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश इंगोले
05-गुरुवार- भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ आय.पी.एस.अधिकारी आदरणीय श्री. देवेनजी भारती सर यांची बुधवारी मुंबई पोलिसांचे" विशेष पोलिस आयुक्त " म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस दलात नवीन पदनिर्मिती करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांकडून समजते.महाराष्ट्र राज्याच्या गृहखात्याने नियुक्ती चे आदेश जारी केले आहेत.मुंबई पोलिस दलाच्या ईतिहासात पहिल्यांदाच मुंबई पोलीस दलात " विशेष पोलिस आयुक्त " हे फद सुरू केले असून आय.पी.एस.पोलिस अधिकारी श्री. देवेनजी भारती सर यांची" विशेष पोलिस आयुक्त मुंबई " म्हणून नियुक्ती केली आहे. श्री.देवेनजी भारती सर यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा व ईतर काही महत्त्वाच्या खात्यांची जवाबदारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रशासकीय गरज म्हणून " पोलिस आयुक्त बृहनमुंबई" ह्यांच्या अधिपत्याखाली "पोलिस सहआयुक्तांच्या " कामावर अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण करण्यासाठी "अपर पोलिस महासंचालक " दर्जाच्या पदाची उणीव लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी मर्यादित यांच्या आस्थापनेवरील संचालक सुरक्षा व अंमलबजावणी हे " अपर पोलिस महासंचालक" श्रेणीचे पद " पोलिस आयुक्त बृहनमुंबई "यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या पदाला "विशेष पोलिस आयुक्त "असे संबोधण्यात येणार आहे.
" विशेष पोलिस आयुक्त " मुंबई पोलीस आयुक्त "यांच्या अधिपत्याखाली असणार आहेत.गृह खात्याच्या आदेशानुसार सर्व " पोलिस सहआयुक्त " हे विशेष पोलिस आयुक्त मुंबई श्री. देवेनजी भारती सर यांना रिपोर्ट करणार, आहेत.
सन्१९९४ च्या बॅच चे आय.पी.एस.अधिकारी असलेले मा. श्री. देवेनजी भारती सर हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.सन् २०१४ ते २०१९ पर्य॔त मा.श्री. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना मा.श्री. देवेनजी भारती सर हे "पोलिस सहआयुक्त मुंबई ( कायदा आणि सुव्यवस्था) होते.तद्नंतर त्यांना " अतिरिक्त पोलिस महासंचालक " म्हणून बढती देऊन " दहशदवाद विरोधी पथकाची"( A.T.S.) एँन्टी टेररिस्ट स्काॅड # जवाबदारी देण्यात आली होती.
सन् २०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आली त्यानंतर मा.श्री.देवेनजी भारती ह्यांना साईड पोस्टींग देण्यात आली.त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदाची जवाबदारी देण्यात आली.
मा.श्री. देवेनजी भारती सर यांची १३ डिसेंबर २०२२ रोजी वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त असताना बदली झाली होती.तेव्हापासून ते नवीन पोस्टींग मिळण्याची वाट बघत होते.
मुंबईतील काही हाय प्रोफाईल प्रकरणांसह शहरातील काही महत्त्वाच्या तपासामध्ये मा.श्री.देवेनजी भारती सर यांचा समावेश होता. २६/११च्या मुंबई दहशदवादी हल्ल्याचा तपास ,मिड डे वृत्तपत्राचे वरिष्ठ गुन्हे संपादक जे.डे.ह्यांच्या हत्येचा तपास करणार्या पथकात मा.श्री. देवेनजी भारती सरांचा समावेश होता.२६/११मुंबई दहशदवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला फाशीची शिक्षा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने काही अधिकार्यांवर जवाबदारी टाकली होती त्यामध्ये मा.श्री. देवेनजी भारती ह्यांचा समावेश आहे.
=========================
भुषण प्र.कुंडईकर